महाराष्ट्र

पैगंबर शेख यांना समाज भूषण पुरस्कार

याच कडूस गावामध्ये मागील वेळी माझे भाषण झाले होते. त्या भाषणामुळे कडूस गाव महाराष्ट्रात पोहोचले असे ताई म्हणाल्या. पण ते तसे नाहीये. तर या कडूसच्या भूमीत माझे भाषण झाल्यामुळे मी महाराष्ट्र भर पोहोचलो. ही या भूमीची किमया. त्याबद्दल या भूमीला मी प्रथमतः वंदन करतो…

पण त्या दिवशीच्या भाषणानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या. त्यातल्या काही माझ्या सासू सासऱ्यांना फोन करून लग्न मोडा इथवर गेल्या. भाषण एकदा झाले पण त्यातून झालेली वळवळ ही महिनाभर सुरू होती. पण मी देखील कुठल्याही बाबत माघार घेतली नाही. शेवटी ज्यांनी वळवळ केली ते माघारी फिरले…

आज ज्या ठिकाणी भाषण झाले त्याच ठिकाणी ‘समाज भूषण’ पुरस्कार मला मिळतोय. पण हा पुरस्कार मला मिळत नसून मी मांडत असलेल्या विचारांना हा पुरस्कार मिळतोय असे मी समजतो. विचार महत्वाचे आहेत व्यक्ती नाही. मी शिव-फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारा जपणारा आणि जमेल तेवढी जगणारा तरुण आहे. हा पुरस्कार देखील मी याच महान विभूतींना तुमच्या सर्वांच्या साक्षीने समर्पित करतो.

कडूसच्या ग्रामस्थांनी मला भरभरून प्रेम दिले. त्यांच्या या प्रेमाबद्दल मी कायम त्यांचा ऋणी राहील. आणि ज्या शिव-फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेला त्यांनी बळ दिले त्या विचार धारेचा प्रसार आणि प्रचार मी करत राहील. धन्यवाद..!

– पैगंबर शेख
मुस्लिम समाज सुधारणा चळवळ

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login