अत्याचारच्या आरोपातून मुक्तता…

सोलापूर सरगम नगर मुळेगांव रोड येथे राहणारी पिडीता हिचा विवाह मट कुटुंबियात मे २०२२ मध्ये झाला होता लग्नानंतर ती गर्भवती असल्याने विचारणा केली असता दि.१२/०३/२०२२ रोजी सरगम नगर मुळेगांव रोड सोलापूर येथे व त्यापूर्वी पाच-सहा महिन्यापासून आरोपीत इसम सुरेश नागनाथ गवळी याने मुलगी पिडीता हिचे बरोबर अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली व त्यानंतर तीने मुलास जन्म दिला अशी फिर्याद पिडीताने दिलेली होती. संदर गुन्ह्याच्याकामी सुरेश गवळी यास अटक करण्यात येऊन दोषारोप पत्र दाखल करण्यात आलेले होते. तर सदर तपासाकामी डि.एन.ए रिपोर्ट घटनास्थळ पंचनामा मजिस्ट्रेट समोरील जबाब अशा दोषारोप पत्रामध्ये सामील करण्यात आले होते.
सुरेश गवळी यांच्या वतीने अॅड. अजमोद्दीन शेख यांनी रक्ताने नमुने योग्य पद्धतीने घेतले नाहीत व ते सरंक्षित केले नाही आणि कायद्यातील तरतुदी प्रमाणे तो याच गुन्ह्यातील आहे असे सरकारी पक्षाने निसंशयपणे शाबीत केलेले नाही. तर पिडीता ही मिळून आली नाही. त्यामुळे तीचा घेण्यात आलेल्या जबाबास कायद्याने महत्त्व देता येणार नाही असा युक्तीवाद केला असता तो ग्राह्य धरून मेहरबान विशेष सत्र न्यायाधीश यांनी आरोपीची संशयाचा फायदा घेऊन निर्दोष मुक्तता केली.
याकामी अँड अजमोदीन शेख, अँड सैफोद्दीन शेख यांनी काम पाहिले.