क्राईममहाराष्ट्रसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

सोलापुरातील या सराफ व्यापाऱ्यास बलात्काराच्या गुन्ह्यात अटक…

बार डान्सर वर बलात्कार केल्याप्रकरणी सराफ व्यापारी माणिक सुरेश नारायणपेठकर रा.सोलापूर याचेविरुध्द सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
यात हकिकत अशी की, पिडीता हि कामानिमित्त फेब्रुवारी 2024 मध्ये सोलापूर येथे आली होती.त्यावेळी पिडीता हि तिचे भावाला अंगठी खरेदी करिता आरोपी चे नारायणपेठकर ज्वेलर्स मध्ये गेली होती. त्यावेळी आरोपीने पिडीतेची खाजगी माहिती व व कोठून आला आहात अशी माहिती विचारली.त्यावेळी पिडितेने त्यास मी आँर्केस्टा असून काम शोधत असल्याचे सांगितले. त्यावेळी आरोपीने पिडितेस माझी बर्याच बार मालकांशी ओळख आहे असे म्हणून पिडीतेसोबत सलगी वाढवली व पिडीतेचा मोबाईल नंबर मागून घेतला.तदनंतर आरोपी हा पिडीतेसोबत फोनवरून बोलणं सुरु झाले.
तदनंतर दि. पुन्हा पिडीता हि सोने खरेदी करण्यासाठी आरोपी चे दुकानात गेली त्यावेळी तिने सोने खरेदी केले व पिडितेने आँनलाईन पेमेंट पाठवले व तेथून निघून गेली. तदनंतर त्याच दिवशी आरोपीने पिडीतेस सांयकाळी बार मालकाशी ओळख करून देतो असे म्हणून सांयकाळी बार्शी रोड येथे येण्यास सांगितले. त्यामुळे पिडीता हि रिक्षा ने त्याठिकाणी बार्शी रोडवरील एका लाँजवर गेली त्याठिकाणी आरोपीने पिडीतेवर तिचे ईच्छेविरूध्द जबरदस्तीने बलात्कार केला व खिशातील बंदुक काढून याबाबत बाहेर कोणाला काही सांगितलेस तुला ठार मारेल अशी धमकी दिली आहे अशा आशयाची फिर्याद पिडितेने आरोपीविरुद्ध सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सदर गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी माणिक सुरेश नारायणपेठकर यास दि.31/5/2024 रोजी अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel