मराठा समाजामुळे प्रणिती ताई शिंदे यांचा विजय मोठा होणार – युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे
सोलापूर लोकसभा निवडणुक निकाल उद्या 4 जूनला असून सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार प्रणिती ताई शिंदे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील.या विजयात एम फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालला.पण शहर जिल्ह्यातील मराठा समाजाचा वाटा मोठ्या प्रमाणात असणार आहे.या विजयाचा गुलाल आम्हीच उधळू असा विश्वास युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी केला.
मराठा समाजाची भाजपाने आरक्षणासंबंधी वेळोवेळी केलेली फसवणूक व आंतरवाली सराटी मध्ये महिलांवर केलेला पोलीसांकडून लाठीचार्ज मराठा समाज विसरणार नाही.मनोज जरांगे पाटील पॅटर्न संपुर्ण महाराष्ट्रभर चालला.राष्ट्रीय काँग्रेस नेते राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले 50% आरक्षण पार करून व जातीय जनगणना करून मराठा समाजाला आरक्षण देऊ ही भुमिका काँग्रेस पक्षाने घेतली.प्रणितीताई शिंदे हे सुद्धा गावोगावी प्रचार करत असताना मराठा समाजाला आश्वासन दिले.निवडून आल्यानंतर संसदेत आरक्षणासंदर्भात मराठा समाजाची भुमिका मांडणार.यामुळेच शहर- ग्रामीण भागातील संपुर्ण मराठा समाज प्रणितीताई शिंदे यांच्या पाठीशी राहून सर्वाधिक मतदान केले.एक लाखाच्या मताधिक्यांनी प्रणितीताई निवडून येतील असा विश्वास गणेश डोंगरे यांना आहे.