देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी विरद्ध परिवर्तनाची लाट आली आहे…
देशात भाजप च्या तानाशाही विरुद्ध जनता एकवटली आहे. मागच्या दहा वर्षांत भाजप सरकार जनतेला विकासापासून वंचित ठेवण्याचे अक्षम्य पाप केले आहे. रोजगार ,महागाई, गरिबी या समस्या उग्र रूप धारण केले तरीही लोकांना धर्माच्या नावाखाली संमोहित करून धार्मिक ध्रुवीकरण करून राष्ट्रीय एकता धोक्यात आणले, लोकशाही पायदळी तुडवून फॅसिझम ची नांदी आणण्याचा घाट घातला होता.यासर्व देशविघातक प्रवृत्तींना मूठमाती करून जनतेला परिवर्तनाची लाट स्वीकारून इंडिया आघाडी महाविकास आघाडी ला भरभरून प्रतिसाद देऊन लोकशाही बळकट करण्याचे कार्य केले. उत्तर भारत आणि दक्षिण भारत यावेळी जुमला हाणून पाडले. त्यामुळे इंडिया आघाडी आता निर्णायक ठरली आहे. अशा सर्व लढाऊ जनतेचे अभिनंदन तसेच सोलापूर ला विकासापासून वंचित ठेवणाऱ्या भाजपला घरचा रस्ता दाखवून प्रणिती शिंदे यांना विजय केल्याबद्दल जनतेचे जाहीर आभार मानले.