पत्नीच्या खूनाचे आरोपातून पती निर्दोष:-अँड.संतोष न्हावकर…
चारित्र्याचे संशयावरून पत्नीचा सपासप वार करून खून केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी सिध्दू किसन हराळे रा.हराळेवाडी, ता.मोहोळ याचेविरुध्द भरलेल्या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन मे.अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती आय.ए.शेख यांनी आरोपीस निर्दोष करणेचा आदेश दिला.
यात हकिकत अशी कि,
फिर्यादी खंडू तात्याबा माने याची लहान बहीण मनिषा हीचे सन २००४ साली मौजे हराळवाडी ता. मोहोळ येथील सिध्दू किसन हराळे याचेसोबत लग्न झाले होते. त्यांना दोन मुली १) सुजाता २) काजल व एक मुलगा ३) समर्थ असे असुन आरोपी ची मौजे गुंजेगाव ता.द. सोलापुर येथे शेती असल्याने फिर्यादीची बहीण मणिषा ही तिचे कुटुंबियांसह शेतातील बंडगर वस्ती येथे राहणेस होती. दि २४/०९/२०२१ रोजी सांय. ०४.३० चे सुमारास मनिषा व आरोपी असे दोघे मिळून फिर्यादी चे घरी भाची नामे सुश्मीता ही डिलेव्हरी झाल्याने तिला बघण्यासाठी आले होते. त्यावेळी मनिषा हीने सांगीतले की, माझा नवरा मला सुमारे दोन महीन्यापासुन मी दुस-याचे शेतात कामास गेल्यानंतर माझे चारीत्रेवर संशय घेवुन मला शिवीगाळ दमदाटी करीत आहे असे सांगीतले.
दि.२५/०९/२०२१ रोजी दुपारी १२.४५ वा चे सुमारास फिर्यादी हा घरी असताना आरोपी सिध्दु किसन हराळे यांचा फोन आला व त्यांने सांगीतले की, माझे हातून घात झाला आहे व मी तुझे बहीणीला जिवे ठार मारले आहे अशी कबुली दिली त्यामुळे लगेच फिर्यादी ने सदर वरील प्रकाराबाबत त्याचे आई, वडील, पत्नी,बहीण यांना सांगीतले. त्यानंतर सर्वजण मिळून मौजे गुजेगाव ता.द. सोलापुर येथील बंडगर वस्ती येथे मनिषा यांचे वस्तीवर दुपारी ०२.४५ वा चे सुमारास गेले तेंव्हा त्यांचे पत्राशेडचे दरवाजासमोर मनिषा पडली होती त्यावेळी तिचे डावे कान फाटुन कानातुन, डोक्यातुन रक्त आले होते. तसेच तिचे तोंडावर,कपाळावर रक्त होते. तसेच तेथे आजुबाजुस देखील रक्त पडलेले होते. त्यानंतर त्या ठिकाणी पोलीस आले व फिर्यादीने आरोपीविरुद्ध मनीषाच्या खून केल्याची मंदुप पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली होती.
यात आरोपीस घटनास्थळावरून अटक केली होती व आरोपीविरुद्ध सखोल तपास करून पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले होते. आरोपीविरुद्ध भरलेल्या खटल्यात सरकार पक्षाकडून एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी मयतासोबत अनैतिक संबंध असलेला सिद्धू पडवळे याची सरकारपक्षाने नोंदवलेली साक्ष महत्वाची होती.
परंतु आरोपीतर्फे घेतलेल्या उलटतपासात तो खोटे बोलत असल्याचे उघड झाले.
आरोपीतफे अँड. संतोष न्हावकर यांनी युक्तिवाद करताना आरोपीने फिर्यादीस फोनवर दिलेला कबुली जवाब विश्वासार्ह नसून अनैतिक संबंध असलेला साक्षीदार हा मयतावर एकतर्फी प्रेम करीत असल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले व त्यापुष्ठर्थ मे.सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्याय निवाडे दाखल केले.सदरचा युक्तिवाद ग्राह्य माणून मे.न्यायालयाने आरोपी सिध्दू किसन हराळे याची निर्दोष मुक्तता केली.
यात आरोपीतर्फे अँड.संतोष न्हावकर,अँड.किरण सराटे,अँड. वैष्णवी न्हावकर,अँड.राहुल रूपनर,अँड. शैलेश पोटफोडे,अँड श्रेयांक मंकणी यांनी तर सरकारतर्फे अँड.कविता बागल यांनी काम पाहिले.