सोलापुरात मोबाईल दुकान फोडले , 24 मोबाईल जप्त
एन. जी. ईलेक्ट्रानिक्स मोबाईल, माणिक चौक, सोलापूर शहर ही मोबाईल शॉपी, रात्रीचे सुमारास फोडुन, दुकानातील मोबाईल फोन, स्मार्ट वॉच व कानातील इअरपॉड चोरी झालेबाबत, फौजदार चावडी पोलीस स्टेशन, सोलापुर शहर येथे गुरनं. ३७४/२०२४ भा.दं. वि.सं. कलम ३८०, ४५४, ४५७ अन्वये गुन्हा दाखल आहे.
सदरचा गुन्हा उघडकीस आणून, मुद्देमाल हस्तगत करणेबाबत मा.श्री. एम राजकुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, मा.श्री. विजय कबाडे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्रीमती प्रांजली सोनवणे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. तोरडमल, सहायक पोलीस आयुक्त, विभाग-१, यांनी गुन्हे शाखेचे व फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन केले होते.
त्याअनुषंगाने, गुन्हे शाखेकडील सपोनि/विजय पाटील व त्यांचे तपास पथक तसेच फौजदार चावडी पोलीस ठाणे कडील सपोनि/शंकर धायगुडे व त्यांचे तपास पथक यांना, दि. १७/०६/२०२४ रोजी, खात्रीशिर बातमी मिळाली की, ” एक इसम हा चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी सोलापुर पुणे हायवेवरील बंद पडलेल्या राहुल हयुन्डाई शोरुम जवळ थांबला आहे.” त्यामुळे, सदर बातमीची शहा- निशा करून कारवाई करणेकामी, सपोनि/विजय पाटील, सपोनि/शंकर धायगुडे हे त्यांचे तपास पथकासह सदर ठिकाणी जावुन, बातमीतील संशयीत इसमास ताब्यात घेतले. त्यावेळी, त्याचेकडे चौकशी करता, मोबाईल विक्री करणाऱ्या सदर संशयीत इसमाचे नांव कासिम ऊर्फ सोहेल शफिक शेख, वय-२७ वर्ष, रा.९२ सिध्देश्वर पेठ, पटेल किराणा शॉपचे समोर, सोलापुर असे असल्याचे निष्पन्न झाले. त्याचेकडे अधिक चौकशी करता, सदरचे चोरीचे मोबाईल फोन हे, त्याचा मित्र नामे- (मोबाईल दुकान फोडणारा इसम) जमीर रफिक बागवान, वय-३४ वर्ष, रा.लक्ष्मी मार्केट, सोलापुर याने, एम. जी. इलेक्ट्रॉनिक्स या दुकानात चोरी करून, त्याची विक्री करणेसाठी त्याचेकडे दिले असल्याचे सांगितले. त्यामुळे, कासिम ऊर्फ सोहेल शफिक शेख याचे ताब्यातुन चोरीचे एकुण २४ मोबाईल फोन, ०४ स्मार्ट वॉच, १० कानातील इअरपॉड असा एकुण ०२,४४,९०९/- रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर नमुद गुन्हयात, वर नमूद दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास फौजदार चावडी पोलीस स्टेशन करीत आहे. नमूद दोन्ही आरोपी हे, पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहेत.
सदरची कामगिरी मा.श्री. एम राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, मा.श्री. विजय कबाडे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ, मा. डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, श्रीमती- प्रांजली सोनवणे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. तोरडमल, सहायक पोलीस आयुक्त, विभाग- १. श्री. दिलीप शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फौजदार चावडी पोलीस स्टेशन, श्री. सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली, सपोनि/विजय पाटील व सपोनि/शंकर धायगुडे व पोलीस अंमलदार प्रविण चुंगे, राहुल तोगे, आबाजी सावळे, विठठल यलमार, अजिंक्य माने, धिरज सातपुते, विनोद व्हटकर, कृष्णात बडुरे, अतिश पाटील, विनोद पुजारी, तसेच सायबर पोलीस ठाणेकडील प्रकाश गायकवाड व मच्छिद्र राठोड यांनी संयुक्तपणे केली आहे.