महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कक्षेत आणावे
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना युनियनचे निवेदन
केंद्र शासनाने महाविद्यालयीन प्राध्यापकाप्रमाणेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कक्षेत आणावे, अशी मागणी सोलापूर जिल्हा कॉलेज कर्मचारी युनियनने केली आहे.
माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना कॉलेज कर्मचारी युनियन सोलापूरच्या वतीने अकलूज येथे हे निवेदन देण्यात आले. यात या प्रमुख मागणीचा या निवेदनात समावेश होता. आपण लोकसभेत हा प्रश्न मांडू, असे आश्वासन खासदार मोहिते पाटील यांनी यावेळी दिले.
निवेदन देताना कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले, सरचिटणीस राजेंद्र गिड्डे, खजिनदार राहुल कराडे, सिनेट सदस्य अजितकुमार संगवे, युनियनचे माजी चेअरमन अण्णा गवळी (मोहोळ), संगमेश्वर महाविद्यालयाचे राजेंद्र तोळनूर, चंद्रकांत खानापुरे, चिदानंद स्वामी, महाडिक महाविद्यालय मोडनिंबचे सुरेश वाघमारे, अकलूजचे विजय कोळी, सुनीता काटे, रमजान शेख, दीपक शिंदे, भारत पवार आदी उपस्थित होते.