Solapur court matterन्यायालय निर्णयमहाराष्ट्र

आर्थिक फसवणूक व एमपीआयडी कायद्यांतर्गत अटकेतील आरोपीस मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर

वरील प्रकरणात दिनांक ०७/११/२०२३ रोजी जेलरोड पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे क्रमांक -४१४/२०२३ अन्वये भा.द.वी. १८६० चे कलम ४२०, ४०६,३४ तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियम १९९९(MPID Act) चे कलम ३ अनुसार यातील आरोपी रवींद्र रमेश लाडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरणात फिर्यादीची ओळख आरोपी सोबत फिर्यादीच्या मित्रांनी करून दिली होती त्या संबंधित आरोपी हा ट्रेडिंगचा व्यवसाय करत होता व त्याच ट्रेडिंगच्या व्यवसायाच्या माध्यमातून पैसे गुंतवणूक केल्यास कोणत्याही रिस्क शिवाय गुंतवणूकदारास रोज १ टक्का परतावा नफ्याचे स्वरूपात देतो तसेच मोठी रक्कम गुंतवल्यास कोणत्याही रिस्कशिवाय दरमहा २० टक्के परतावा नफ्याचे स्वरूपात देतो असे म्हणून ट्रेडिंगमध्ये गुंतवलेली मूळ रक्कम ११ महिन्यांमध्ये काढता येत नाही ११ महिन्यानंतर मुद्दल रक्कम काढता येते असे सांगितले होते. वरील गोष्टींवर विश्वास ठेवून फिर्यादीने १६ लाख गुंतवलेले होते आणि त्यांचे मित्र जयेश संगा यांनी देखील फिर्यादीचे सांगण्यावरून आरोपीच्या गोल्ड- फाय एल पी रॉयल इन्वेस्टमेंट कंपनीमध्ये ११ लाख रुपये गुंतवले होते तसेच आणखीन एक मित्र संतोष पारशेट्टी यांनी देखील कंपनीत ११ लाख रुपये गुंतवलेले होते. प्रकरणाचा गंभीर्य लक्षात घेऊन सदर प्रकरण हे सोलापूर आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते.आरोपीने फिर्यादीला बोंड स्वरूपात सेक्युरिटी म्हणून आणि समर्थ सहकारी बँक लिमिटेड सोलापूर येथील ब्लॅक चेक सुद्धा दिलेले होते. तसेच आरोपीच्या २० टक्के परतावा देतो या अमिषाला बळी पडून फिर्यादी आणि इतर लोकांची एकूण ३८ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक आरोपीने केल्या असल्याची फिर्याद देण्यात आले होती. आरोपी रवींद्र लादे याचा जामीन अर्ज सोलापूर येथील विशेष न्यायालयाने नामंजूर केला होता. त्यानंतर आरोपीने आपला जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला होता. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अनिल सत्यविजय किलोर यांनी आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे. यात आरोपीतर्फे ॲड.कदीर औटी,ॲड. आकाश कवडे, ॲड. दत्तात्रय कापुरे, ॲड. निलेश कट्टीमनी यांनी काम पाहिले तसेच सरकारी पक्षातर्फ श्रीमती वीरा शिंदे यांनी काम पाहिले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel