लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर; विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केलं अभिवादन
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अग्रणी, जगविख्यात साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 55 व्या स्मृतिदिनानिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकातील अण्णाभाऊंच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मज भीमराव..!
पृथ्वी ही नागाच्या फण्यावर तरली नसून, कष्टकरी व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे. असं ठणकावत मनामनात क्रांतिची ठिणगी पेटविणारे, शोषितांच्या उत्थानासाठी आपले आयुष्य वाहिले आहे. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनसाठी अनुयायानी गर्दी केली होती.
त्या निमित्तानं सामाजिक, साहित्यिक व राजकीय वर्तुळातून त्यांच्या विचारांचा जागर केला जात आहे. सोशल मीडियामध्ये त्यांचे विचार शेअर केले जात आहेत.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सोलापूर महानगर पालिकेचे उपायुक्त श्री मुलाणी, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक उत्तमप्रकाश खंदारे, विद्यमान अध्यक्ष खंडू बनसोडे, युवराज पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
दरम्यान, सकाळपासूनच विविध संस्था राजकीय पक्ष व समाज बांधवानी अभिवादन केले.यामध्ये सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल, जिल्हा उपाध्यक्ष महेश कोठे,जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे, प्रमोद गायकवाड,अजित पात्रे,शंकर पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट ) शहराध्यक्ष संतोष पवार, जुबेर बागवान, प्रमोद भोसले,संगीता जोगधनकर, प्रशिक सामाजिक संस्थेचे सुशील सरवदे,शिवम सोनकांबळे,
, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष नागेश रणखांबे, विजय सोनवणे, सचिन शिंदे,GM मागासवर्गीय संस्थेचे शशिकांत गायकवाड,हर्षवर्धन बाबरे,आप्पा बगले, आप्पा गायकवाड,दत्ता शिंदे,पी बी ग्रुप,मातंग युवक संघटना, स्वराज्य मातंग समाज,नवरंग तरुण मंडळ, एम के मित्र परिवार, यू के ग्रुप, आर. सी ग्रुप, एकता ग्रुप आदी मंडळानी अभिवादन केले.
यावेळी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव मंडळाचे सुरेश पाटोळे,उपाध्यक्ष सतीश बगाडे, रजनी डोलारे, कार्याध्यक्ष तुषार खंदारे, सचिव विशाल लोंढे, विवेक डोलारे,माजी अध्यक्ष श्रीकांत देडे, रमेश बोराडे, लखन गायकवाड, साक्षांत लोखंडे, कोषाध्यक्ष सागर डोलारे,ऍड शैलेश पोटफोडे, ऍड अर्जुन देडे, सूर्यकांत केंदळे,लष्कर मातंग समाज अध्यक्ष भीमराव गायकवाड,दलित स्वयं संघांचे संघ प्रमुख विजय पोटफोडे, अमर पवार आदी उपस्थित होते.
गीत गायन व रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गीत गायन कार्यक्रमामध्ये अण्णा भाऊंच्या शाहिरी, पोवाडे आदी गाण्यांनी आठवणीला उजाळा मिळाला. तसेच आंबेडकरी, विद्रोही गीतांच्या माध्यमातून साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे कलापथकांकडून आंबेडकरी, विद्रोही गीते सादर करण्यात आली.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान, साकेत मागासवर्गीय बहुद्देशीय संस्था, सावधान तरुण मंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 201 रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान केले.