अपघाताला आळा घालण्यासाठी पथनाट्य कलेतून जनजागृती.
राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचा उपक्रम
सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( चित्रपट साहित्य व कला सेल ) यांच्या वतीने अजित दादा पवार – राष्ट्रीय नेते तथा राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री आणि माननीय खासदार सुनीलजी तटकरे – प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रपट सांस्कृतिक विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर यांनी दयानंद महाविद्यालय व तेथील विद्यार्थ्यांसाठी
“अपघातावर आळा घालण्याकरिता कलेतून प्रबोधन व जनजागृती”
या पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते या पथनाट्य मध्ये खालील मान्यवर व कलावंतांचा समावेश होता.
दयानंद महाविद्यालयाच्या 4 ही प्राचार्य या पथनाट्यास उपस्थित होते दयानंद कला शास्त्र महाविद्यालय – बी. एच. दामजी सर. दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे – शिंदे सर. दयानंद विधी महाविद्यालयाचे – गायकवाड मॅडम. दयानंद शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे – क्षीरसागर सर. तसेच दयानंद विद्यालयाचे एनएसएस विभागाचे प्राध्यापक सुद्धा उपस्थित होते.दयानंद कला शास्त्र महाविद्यालय – पाटणकर मॅडम. दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे – पाटील सर.
पथनाट्य मध्ये सादरीकरण केलेल्या कलावंतांची नावे.
महामाया चंदन डावरे
रक्षिता श्रीशैल बळुरगी
बजरंग यादव होटकर.
गुरुनाथ विठ्ठल गोडसे.
हनुमंत संभाजी सलगर आदी कलाकाराने सहभाग नोंदविला
याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान संगीता जोगदनकर किरण माशाळकर प्रकाश जाधव इरफान शेख नागेश निंबाळकर सोमनाथ शिंदे संतोष वेळापुरे प्रकाश झाडबुके प्रकाश मोठे मईंनोदीईन इनामदार आप्पासाहेब ईटकळे आणि इतर शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , महाविद्यालयाचा स्टाफ एनएसएस च्या चारही विभागाचे स्वयंसेवक , महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते