Solapur court matterन्यायालय निर्णय

विनयभंग व ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत एकास मुंबई उच्च न्यायालयातून अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर……

वरील प्रकरणात विजापूर नाका पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे क्रमांक- १३०/२०२४ अन्वये दिनांक १५/०३/२०२४ रोजी भा.द.वि कलम ३५४-अ,५०४,५०६,३४ तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ चे कलम ३(१)(r),३(१)(s),३(२)(va),३(१)(w)(ii) प्रमाणे यातील आरोपी रियाज पटेल याच्या विरुद्ध फिर्यादी गोविंद लांबतुरे यांनी वरील पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता. आरोपी रियाज पटेल याचा एअर कॉम्प्रेसरचा व्यवसाय असल्याने मागील ८ ते ९ महिन्यांपूर्वी त्याच्या एअर कॉम्प्रेसर चे काम करण्यासाठी फिर्यादी हा आरोपी वर विश्वास ठेवुन जकराया शुगर येथील काम सोडून कुटुंबासहित सोलापुर येथे वास्तव्यास होता. त्यानंतर कामानिमित्त तो पुणे, कोल्हापूर, विजापूर व इत‌त्र ठिकाणी फिरून एअर कॉम्प्रेसर चे काम करत होता. त्यानंतर २ ते ३ महिने आरोपीने त्यासोबत व्यवस्थित वागला व नंतर विनाकारण मानसिक छळ तसेच शिवीगाळी करू लागला. फिर्यादी कामानिमित्त बाहेर गावी असल्याने आरोपीने याचा गैरफायदा घेऊन फिर्यादीचे पत्नीचे विनयभंग केला होता व त्यांना “तुझ्या नवऱ्याला ठार मारून टाकतो” असे म्हणून धमकी दिली होती. घडलेल्या प्रकाराबाबत आरोपीस विचारले असता आरोपीने फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ केली तसेच दमदाटीही केली होती आणि “तू कोणाकडे जायचं आहे त्याच्याकडे जा, माझे कुणीही वाकडे करू शकत नाही असे बोलून अशोभनीय वर्तन केले होते.आरोपीने आपला अटकपूर्व जामीन अर्ज मे. जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता . मे.जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर आरोपीने आपला अटकपूर्व जामीन अर्ज मे.मुंबई उच्च न्यायालय येथे दाखल केला होता. मे.मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री संदीप मारणे यांनी आरोपीला सशर्त अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.यात आरोपी तर्फे ॲड.कदीर औटी,ॲड. सुरेश खोसे, ॲड. दत्तात्रेय कापुरे, ॲड. निलेश कट्टीमनी,ॲड. सोहेल रामपुरे यांनी काम पाहिले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel