Solapur court matterसोलापूर बातमी

सोलापूर बार असोसिएशन तर्फे विधी व्याख्यानमाला पुष्प पाचवे

सोलापूर बार असोसिएशनने वकिलांसाठी विधी व्याख्यानमालेची सुरुवात केली. व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प सोलापूर जिल्ह्यातील नामवंत युवा विधीज्ञ तथा प्रसिद्ध youtuber ॲड. श्रेया देशपांडे – सापटनेकर यांच्या हस्ते गुंफण्यात आले. प्रस्तुत कार्यक्रमास ॲड. राजशेखर आळंगे, बॉम्बे हायकोर्ट, ॲड. शर्मिला देशमुख, ॲड. अनिता रणसृंगारे, ॲड. सुवर्णा शिंदे, ॲड. अश्विनी कुलकर्णी, ॲड. प्रिया जाधव या ज्येष्ठविधीज्ञांची प्रमुख उपस्थिती होती.
पाचव्या पुष्पातील व्याख्यानाचा विषय “Evolution of the Rights of Hindu Females in Ancestral Property” असा होता. प्रस्तुत व्याख्यानमालेचे उद्घाटन सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजनाने झाली व कार्यक्रमाची प्रस्तावना अध्यक्ष ॲड. अमित आळंगे, यांनी केली व वक्त्यांचा परिचय सहसचिवा ॲड. निदा सैफन यांनी करून दिले.
ॲड. श्रेया देशपांडे यांनी भारतात पुरातन काळापासून स्त्रीला सर्व अधिकार दिले असले तरी प्रॉपर्टीतअधिकार दिला नव्हता. कालांतराने ब्रिटिश सरकारच्या कालावधीत सुरुवातीस पहिल्यांदा महिलांना प्रॉपर्टीत अधिकार देण्यात आला. तदनंतर यात बदल होत गेले आणि विविध हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार त्यांच्या अधिकारात कसे बदल होत गेले व शेवटी महिलांना देखील पुरुषाप्रमाणेच प्रॉपर्टीत समान अधिकार देण्यात आला. याप्रसंगी विविध न्यायालयीन निवाड्यांचे उहापोह करून उत्कृष्ट मार्गदर्शन पावर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे समजावून सांगितले.
सदर कार्यक्रमावेळी सोलापूर बार असो अध्यक्ष ॲड. अमित व्हि आळंगे, उपाध्यक्ष-ॲड. व्ही. पी. शिंदे, सचिव ॲड. मनोज नागेश पामूल, सहसचिव ॲड. निदा सैफन, खजिनदार ॲड. विनयकुमार कटारे सह सोलापूर बार असोसिएशन बहुसंख्य विधिज्ञ उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिव ॲड. मनोज पामुल व आभार खजिनदार ॲड. विनयकुमार कटारे यांनी केले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel