सोलापूर जिल्हा सरकारी वकील राजपूत यांची विवेक घळसासी घेणार प्रकट मुलाखत…
सरकारी वकील पदाच्या कार्यकालात 100 पेक्षा अधिक आरोपींना जन्मठेप तर दोघांना फाशीच्या शिक्षेपर्यत पोहोचवण्याचा विक्रम करणारे सोलापूर जिल्हा सरकारी वकील तथा सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी घेणार आहेत. हा कार्यक्रम बुधवार दि.24 जुलै 2024 रोजी हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये सायंकाळी 6.30 वाजता होणार असल्याची माहिती अॅड.प्रदीपसिंह राजपूत मित्र परिवाराच्या वतीने प्रशांत बडवे यांनी दिली.
संघ परिवाराच्या मुशीत तयार झालेले अॅड प्रदीपसिंह राजपूत यांनी राष्ट्र प्रथम हा उद्देश ठेवून प्रचंड मेहनतीने फौजदारी वकील होवून सरकारी वकील होण्याचा मान मिळवला आणि हे मोठ्या जबाबदारीचे आणि सरकारची बाजु कायद्याच्या चौकटीत मजबुत करण्याचे मोलाचे काम त्यांनी अत्यंत प्रमाणिक आणि परिश्रमाने पार पाडले तसेच अद्यापही करीत आहेत. सोलापूर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात 100 पेक्षा अधिक आरोपींना जन्मठेपेच्या शिक्षेपर्यत पोहोचवून एक आगळा वेगळा विक्रम जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनीच केला. त्याचबरोबर अनेक पिडीतांना न्याय मिळवून देण्याचे पुण्यही त्यांनी केले आहे. गेल्या 6 वर्षातील त्यांच्या कार्यकालात त्यांनी आरोपी आणि गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक अबाधित ठेवला त्यांच्या या परिश्रमाचा आणि कायद्याच्या अभ्यासाचा प्रवास लोकांसमोर यावा म्हणून त्यांच्या मित्र परिवाराने प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला. ही मुलाखत ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसासी यांनी घ्यावी असा आग्रह मित्र परिवाराने केला त्यावर विवेकजी घळसासी यांनी तातडीने होकार दिला. त्यानुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सोलापूरकरांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अॅॅड प्रदीपसिंह राजपूत मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले