सोलापूर बातमीदेश - विदेशमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

सोलापुरात आगळा वेगळा वाढदिवस साजरा,वायफळ खर्च टाळून दिला गरिबांना आधार…

सोलापूर – आपल्याकडे वाढदिवस मोठा थाटमाट केला जातो. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसाही खर्च केला जातो. परंतु, वाढदिवसाला होणारा वायफळ खर्च टाळून काहीजण समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण करतात. सोलापुरातील जमीर शेख यांच्या वाढदिवसावर होणारा खर्च टाळून ग्रुप च्या वतीने वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळून गोरगरिब गरजु लोकांना आधार देण्याचं काम केलंय. त्यांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होतंय.

जमीर शेख हे एक सामाजिक कार्यकर्ते असून प्रहार संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आहे.यांचा 26 जुलै रोजी वाढदिवस होता. वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करत सामाजिक संदेश दिला आहे.समाजातील अपंग आणि गरजू लोकांना मदतीचा हात देण्याचा निर्णय केला. त्यानुसार वाढदिवसावर होणारा वायफळ खर्च टाळून गरजू गरीब लोकांना थंडीपासून सुरक्षा व्हावे यासाठी त्यांना कंबल वाटप करण्यात आले.JP कंपनीच्या वतीने सोलापूर शहरातील सिद्धेश्वर मंदिर, शहाजहुर दर्गा, पासपोर्ट ऑफिस शहरातील आधी परिसरात कंबल वाटप करण्यात आले. जवळपास 80 ते 100 कंबल वाटप करण्यात आले .आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेता समाजातील प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिपरत्वे आपण काहीतरी देणे लागतो. हेच देणे आणि त्याची कृतज्ञता लक्षात घेऊन आगळा वेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.

यावेळी JP कंपनीचे संस्थापक अध्यक्ष जमीर भाई पटेल. मोसिन इनामदार उजेब इनामदार. दौला शेख. सुभानी Sk. गुलाब जमादार समीर नदाफ, साहिल महसूलदार. शकील शेख. जविद मानियार. आदी मान्यवर व कार्यकर्ता उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel