महाराष्ट्र विद्युत वितरण महापारेषण कडून सर्व सामान्य वीजग्राहकांचे वाढीव अमाप बिलास आळा बसविणेबाबत निवेदन
उपरोक्त विषयास अनुसरुन हिंदुस्थान जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या २ ते अडीच वर्षापासून महाराष्ट्र राज्यामध्ये राजकीय पेचप्रसंग तसेच विद्युत महापारेषण विभागाकडे संबंधितांचे लक्ष नसल्याने महापारेषण हे तमाम नागरिकांचे घरगुती वापरातील लाईट बिल हे अमाप वाढवून त्यांच्या महिना बजेटवर डल्ला मारुन सर्वसामान्य माणसाची आर्थिक घडी / बजेट बिघडवत आहेत. यामुळे अनेक सर्वसामान्य नागरिक आर्थिक दिवाळखोरीत असल्याने त्यांचे वीज बिल थकीत असून त्यातच दंड लावल्याने अनेकांना नोटीसाही न देता वीज कनेक्शन खंडीत करुन सदर नागरिकांना डिपॉझिट जमा असताना देखील रिकनेक्शन घेण्याकामी मजबुर करत आहेत. त्यामुळे नागरिकांचा नाईलाज होत असल्याने ते ऊसनेपासने व्याजाने रक्कम घेऊन सदर जुलमी महापारेषण च्या कचाट्यातून वाचण्याचा प्रयत्न करीत आहेत. याप्रती संबंधित विभागास मा. मुख्यमंत्री यांनी स्वता जातीने लक्ष घालून नागरिकांच्या होत असलेल्या आर्थिक, मानसिक, शारिरिक पिळवणुकीबाबत, शोषणाबाबत सुक्त ताकीद देऊन योग्य ती उचित कारवाई करुन नागरिकांच्या तिजोरीवर महापारेषण च्या माध्यमातून पडत असलेला दरोडा रोखण्याकामी संबंधितास आदेश देऊन केलेल्या कारवाई प्रसंगी संघटनेस लेखी अवगत करावे