सोलापूर बातमी

राज ठाकरे यांनी घेतले स्वामी समर्थांचे दर्शन…

स्वामी दर्शनाअंती सत्कारातून झालेला सन्मान आत्मसन्मानाचा गौरव - राज ठाकरे

श्री स्वामी समर्थांचे दर्शन घडणे म्हणजे माझ्यासारख्या स्वामी भक्तांसाठी अत्यंत आनंददायी बाब आहे. स्वामी दर्शनानंतर मंदिर समिती कडून महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार होण म्हणजे आपल्या आत्मसन्मानाचे गौरव असल्याचे मनोगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी राज ठाकरे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. या वेळी राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पुढे बोलताना राज ठाकरे यांनी श्री वटवृक्ष स्वामी समर्थांची स्वामी भक्ती नेहमीच आपण करीत आलेलो आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने माझी व माझ्या कुटुंबीयांची जीवन वाटचाल सुरू आहे असे भावोद्गार काढले. मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या कार्याने श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या धार्मिक कार्याची चौफेर प्रगती झालेली आहे असेही मनोगत व्यक्त करून महेश इंगळे व श्री वटवृक्ष महाराज देवस्थानच्या कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, मनसेचे आमदार बाळा नांदगावकर, मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर, सोलापूर मनसे नेते दिलीप धोत्रे, सचिन मोरे, तालुका अध्यक्ष मल्लिनाथ पाटील, राम मातोळे, नागेश कुंभार, बाबू वागस्कर, प्रशांत गिड्डे, प्रशांत इंगळे, जैनुद्दीन शेख, श्रीकांत पाटील, देवेंद्र शिंदे, तम्मा आळवेकर, आदर्श अंकलगी, समर्थ नरगे, पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, ए.पी.आय.बागव, पी.एस.आय.खापरे, मंदार महाराज पुजारी, व्यंकटेश पुजारी, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, खाजप्पा झंपले, ऋषिकेश लोणारी, सागर गोंडाळ, अविनाश क्षीरसागर, महेश मस्कले,. अक्कलकोट उत्तर पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे..राजु राठोड.पोलीस.आधिकारी.तसेच.पोलीस.अधिकारी..व. पोलीस कर्मचारी. मोठ्या संख्याने.बंदोबस्त करताना.दिसुन.येत. पोलीस निरीक्षक जितेंद्र टाकणे. मार्गशाखाली.मंदिर. परिसरात.बंदोबस्त लावण्यात आला होता. याप्रसंगी.जयप्रकाश तोळणूरे, विश्वास शिंदे व मनसेचे अन्य कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते..

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel