सोलापूर रेल्वे विभागातील, रेल्वे सुरक्षा (RPF) विभागाची उल्लेखनीय कामगिरी
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने, विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. निरज कुमार दोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रेल्वे विभागीय सुरक्षा आयुक्त श्री. आदित्य यांच्या देखरेखीखाली सुरक्षा विभागाने एप्रिल – जुलै – 2024 दरम्यान केलेले महत्वपूर्ण कार्य पुढील प्रमाणे आहेत.-
घरातून पळून गेलेल्या एकूण 20 मुलांची (14 मुले आणि 06 मुली) रेल्वे सुरक्षा विभागाने सुटका केली आणि महिला व बाल संरक्षण समितीकडे सुपूर्द केले तेथून त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
प्रवाशांचे सामान चोरी करणाऱ्यांविरुद्ध रेल्वे सुरक्षा विभागाने सखोल मोहीम राबवून “यात्री सामानाची चोरी” Theft of passenger belonging (TOPB) ची एकूण 23 प्रकरणे उघडकीस आली असून 29 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
रेल्वेकडून अमली पदार्थ तस्करी विरुद्ध मोहीम राबवून 2 गुन्हे उघडकीस आणून एकूण 3. 08 लाख रुपये किमतीचा 58 किलो गांजा जप्त करण्यात आला. जप्त करून आवश्यक कारवाईसाठी जीआरपी कडे सोपवले आहे.
रेल्वे गाड्यांमध्ये मालाची विक्री करणाऱ्या अवैध फेरीवाले/विक्रेत्यांवर मोहीम राबवून एकूण 833 अवैध फेरीवाल्यांना अटक करून माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्याच्याकडून एकूण 7.49 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
दिनांक 06 ऑगस्ट, 2024.
PR क्रमांक 2024/08/03
जनसंपर्क विभाग, मध्य रेल्वे, सोलापूर विभाग यांनी हे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.