सदोष मनुष्यवध प्रकरणी अटकेतील वाळूज येथील बोगस डॉक्टरास जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथून जामीन मंजूर .
वरील प्रकरणात मोहोळ पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे क्रमांक -४६५/२०२४ भारतीय न्यायसंहिता चे कलम १०५,३१८(२),३१९(२) व वैद्यकीय व्यवसायी अधिनियम १९६१ चे कलम ३३(२) तसेच भारतीय वैद्यकीय परिषद ॲक्ट १५(२) अंतर्गत शैक्षणिक पात्रता नसताना व नोंदणी नसताना बेकायदेशीरपणे वैद्यकीय व्यवसाय करून मोहोळ तालुक्यातील वाळूज येथील बोगस डॉक्टर आलोक सुशांत विश्वास (रा.बेराबेरीया थाना आमडंगा राज्य पश्चिम बंगाल) याला मोहोळ पोलिसांनी दि -१३/०७/२०२४ रोजी वाळूज येथील मयत इसम सोमनाथ रणजीत राक्षे यांच्या मृत्यूप्रकरणी अटक केले होते. सदर प्रकरणात दि -११/०७/२०२४ रोजी मयत इसम सोमनाथ राक्षे यास ताप व उलटी येत असल्याने प्राथमिक उपचाराकरिता सदर आरोपीच्या वाळूज येथील क्लिनिक येथे घरातील लोक घेऊन गेले होते. तसेच आरोपीने मयत इसम सोमनाथ याच्यावर उपचार देखील केले होते. त्यानंतर सोमनाथ यास मोहोळ येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घरच्यांना कळवले होते. यातील आरोपी आलोक याच्याकडे प्रत्यक्षात रुग्णांवर उपचार करण्यासाठी व व्यवसाय करण्यासाठी लागणारे कोणतेही वैद्यकीय पदवी प्रमाणपत्र नव्हते तरीदेखील तो मागील ६ ते ७ वर्षांपासून वाळूज तालुका मोहोळ येथे वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचा अहवाल हा मोहोळ येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजस्विनी जाधव यांच्या अहवालात मोहोळ पोलिस स्टेशन येथे सादर करण्यात आले होते आणि बोगस डॉक्टरच्या उपचारामुळेच सोमनाथ राक्षेचा मृत्यू झाला असल्याचे प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकारी यांनी दर्शवले होते. आरोपीने आपला जामीन अर्ज मे. जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.खुणे_ यांनी आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे. वरील प्रकरणात आरोपी तर्फे ॲड.कदीर औटी, ॲड. इरफान पाटील, ॲड. श्रीदेवी काटे-कसबे, ॲड. दत्तात्रेय कापुरे,ॲड. निलेश कट्टीमनी,ॲड. वैभव भोंगे, ॲड. सोहेल रामपुरे यांनी काम पाहिले.