जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूरसोलापूर बातमी

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा प्रहार संघटनेच्या वतीने सत्कार.

सोलापूर, दि. ८:- माहे जुलै २०२३ ते आज रोजी पर्यंत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी अत्यंत तत्परतेने कामकाज केल्याबद्दल विशेषतः दिव्यांगाच्या कल्याणाच्या योजना अत्यंत प्रभावीपणे राबवल्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पक्षाचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी व जिल्हा संपर्कप्रमुख जमीर भाई शेख यांनी पुष्पहार देऊन जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचा सत्कार केला.

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी, जिल्हा संपर्कप्रमुख जमीरभाई शेख, शहर कार्याध्यक्ष खालीद मणियार, दक्षिण तालुका अध्यक्ष सिद्धाराम काळे, रियाज सुगुर हे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यात पदभार स्वीकारल्यापासून कार्तिकी वारी २०२३ ही स्वच्छ वारीचे आयोजन, टंचाई काळात उपाययोजना राबवणे, शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून २५% अग्रीम मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका, अतिवृष्टीने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देणे, रेनगर प्रकल्पाचे घरकुल वितरण कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री महोदय यांच्या दौऱ्याचे यशस्वी आयोजन, टंचाई काळात उजनी धरणातून पाणी वितरण, सोलापूर महापालिकेचा अतिरिक्त पद‌भार स्वीकारल्यानंतर दुहेरी पाईपलाईन साठी केलेले प्रयत्न, जिल्ह्याच्या पर्यटनासाठी करत असलेल्या उपायोजना, आषाढी वारी २०२४ चे यशस्वी आयोजन, जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्याचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी करत असलेले प्रयत्न तसेच दिव्यांगाने साहित्य वाटप करण्यासाठी घेण्यात आलेला मिळावा तसेच दिनांक १९ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२४ या कालावधीत दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान अंतर्गत प्रमाणपत्र वाटप शिबिराचे आयोजन आदी विविध महत्त्वपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने हा सत्कार करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा संपर्कप्रमुख जमीर भाई शेख यांनी दिली.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel