सोलापूर राजकीयमहाराष्ट्रराजकीयसोलापूर बातमी
अड.यु.एन.बेरिया याना शहर मघ्य मतदार संघातून उमेदवारी द्या.
विविध समाज व संस्था कडून मागणी.
सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाकडून शहर मघ्य विधानसभा मतदारसंघातून माजी महापौर अड.यु. एन. बेरिया याना पक्षाची उमेदवारी द्यावी अशी मागणी शहरातील मोची,मुस्लिम, ओ.बी.सी,मागासवर्गीय समाजातील प्रमुख नेते तसेच विविध समाजिक ,शैक्षणिक व कामगार संघटना च्या प्रतिनिधी नी पक्षाच्या कार्यालयात अध्यक्ष सुधीर खरटमल यांचेकडे लेखी निवेदना द्वारे केली.या प्रसंगी नागेश म्हेत्रे, ईमतियाज वळसंगकर, राजेद्र कोरे,आलाबक्ष मनियार,सिद्राम उंबरजे, जाकिर मनियार आदीनी मनोगत व्यक्त केले.अड.बेरिया सारख्या उच्च शिकक्षित,अनुभवी व शहराच्या विकासात योगदान असलेल्या नेत्याला संधी द्यावी अशी मागणी केली. मोठ्या संख्येने नेते व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सर्व कार्यकर्त्यांच्या भावना आपण मा.पवार साहेबा पर्यतं पोहोचवू असे अध्यक्ष खरटमल यानी सागिंतले.