सोलापूर बातमी

गतिरोधक प्रश्नावर निद्रिस्त प्रशासनाचे डोळे उगडण्यासाठी मानवअधिकार संघटनेचे लक्षवेधी आंदोलन

श्री सिद्धेश्वर साखर कारखाना ते कुंभारी रोडवर अनेक अपघात झाले असून बळी देखील गेलेले आहेत या बाबत विडी घरकुल येथील अमन चौकात गतीरोधक करण्याची मागणी यापूर्वी मानव अधिकार संघटनाने वेळोवेळी केली होती त्याच बरोबर वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देखील सादर करण्यात आले होते परंतु या सुस्तावलेल्या प्रशासनला अद्याप जाग आली नसल्याने अखेर मानव अधिकार संघटनाने आंदोलन चे हत्यार उपसत अमन चौक येथे प्रशासनचे लक्ष वेधण्यासाठी अखेर आंदोलन करण्यात आले दिनांक.११-१०-२०२३ पासून मानव अधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय कडे वेळोवेळी निवेदन व पाठपुरावा करून देखील आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागने कुठलीही दखल घेतली नाही म्हणून मानव अधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने अमन चौक ग्राउंडवर प्रशासन व राज्य सरकार चे लक्ष वेधण्यासाठी लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.अमन चौकात तात्काळ गतिरोधक करा अशी मागणी लावून धरली.
यावेळी मानवाधिकार संरक्षण संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सादिक शेख, प्रदेश संघटक श्रीकांत कोळी, राज्य अध्यक्ष (सामाजिक संरक्षण विभाग) प्रवीण चांदेकर, प्रदेश संपर्कप्रमुख मेहबूब कादरी, शहराध्यक्ष अजहर बिजापुरे, जिल्हाध्यक्ष (आरोग्य विभाग) अकबर शेख, सामाजिक कार्यकर्ते एजाज खलिफा, शहर संपर्कप्रमुख फयाज मुल्ला, मीर मोहम्मद खान,नागनाथ गणपा, इरफान मुजावर, सलीम शेख या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel