कंदलगाव, भंडारकवठे, मंद्रूप भागातील एस टी गाड्या सुरळीत करण्यासाठी दक्षिण सोलापूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष इंजि.महेश जोकारे यांनी निवेदन देवून अधिकाऱ्यांना खडसावले…
गेल्या एक महिन्यापासून मंद्रूप, भंडारकावठे, निंबर्गी, बाळगी, लवंगी, सादेपूर, विंचूर, कुसूर, औज, कंदलगाव या भागातील शालेय विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी तसेच कामानिमित येजा करणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
सदर गावातील काही नागरिक व विद्यार्थी यांनी दक्षिण कांग्रेस युवक अध्यक्ष महेश जोकारे यांच्याकडे तक्रार घेवून आले असता खा. प्रणिती ताई शिंदे यांच्या मार्गदर्शनात, महेश जोकारे यांनी ताबडतोब २३ ऑगस्ट, २०२४ रोजी अधिकाऱ्यांना भेटून गाड्या सुरळीत करण्यासाठी खडसावून सांगितले.
त्यांनतर ए. टी. एस. मल्लिकार्जुन अंजुटगी आणि आगारप्रमुख जुंधले साहेब यांनी सोमवार पासून एस टी वेळापत्रक सुरळीत चालवण्याचे आश्वासन दिले. सर्व अधिकाऱ्यांनी येत्या सोमवार पासून किंवा २६/०८/२०२४ पासून या भागात नियमित गाड्या पाठवू असे वचन दिले. शिवाय यावर लवकरच कार्यवाही झाली नाही तर युवक काँग्रेस तर्फे उग्र आंदोलन करण्याचा इशारा महेश जोकारे यांनी अधिकाऱ्यांना दिला.
यावेळी सोबत शिव कलशेट्टी, harun जमादार, सचिन विरदे, मल्लिकार्जुन बशेट्टी, संकेत पाटील, मयूर शिंदे इत्यादी उपस्थित होते