सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ कार्यालय उद्घाटन व अहवाल प्रकाशन…
सोलापूर – स्वातंत्र्यपुर्व काळात स्थापन झालेल्या सार्वजनिक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन व वार्षिक अहवालाचे प्रकाशन शिवानुभव मंगल कार्यालय येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले प्रारंभी श्री कामेश्वर अतिथी गणपतीचे पुजन करुन आरती करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टी माजी अध्यक्ष सुनील रसाळे यांनी केले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर शोभाताई श्रीशैल बनशेट्टी,दिलीपराव धोत्रे,जैनोद्दीन शेख,प्रशांत इंगळे उपस्थित होते त्याचां सत्कार ट्रस्टी अध्यक्ष बसवराज येरटे व उत्सव अध्यक्ष विनायक महिंद्रकर यांनी केले याप्रसंगी माजी ट्रस्टी अध्यक्ष दास शेळके यांनी मनोगत व्यक्त केले तसेच सार्वजनिक मध्यवर्ती मंडळाचा इतिहास, श्री आजोबा गणपती यांची प्रेरणा घेऊन लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सोलापुरात आल्यानंतर हा गणेशोत्सव सार्वजनिक रुपात महाराष्ट्रभर साजरा करण्याचा निर्णय घेतला मध्यवर्ती संस्थापक माजी आमदार धर्मवीर वि.रा.पाटील ,माजी महापौर वि.सि.बनशेट्टी,सिद्रामप्पा फुलारी,मंजनराव पुकाळे,प.रे.कोसंदर,ह.ई.राचेटी,आण्णा सांळुके यांच्यासह कार्यवृतांतचा अहवाल पुस्तक रुपी छापुन याची महाराष्ट्रभर प्रसार करण्याचे मनोगत दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केले सदर प्रसंगी सर्व आजी माजी ट्रस्टी उत्सव समितीचे पदाधिकारी व गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते….