माजी मंत्री परीक्षार्थी लक्ष्मण ढोबळे यांचा सोलापूर विद्यापीठातील पी एच. डी. प्रवेश त्वरित रद्द करा- सिनेट सदस्य गणेश डोंगरे विद्यापीठाकडे निवेदनाद्वारे मागणी…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथे पीएचडी कोर्स वर्क पेट-८ साठी विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेतून परीक्षार्थी लक्ष्मण ढोबळे यांचा प्रवेश त्वरीत रद् करा आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या मार्गदर्शकांची गाईडशीप रद्द करा, अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ, मा.गणेश डोंगरे, अधिसभा सदस्य, यांचा विद्यापीठाला इशारा
विद्यापीठाने पीएच.डी. पेट-८ कोर्स वर्ककरिता घेण्यात आलेल्या परीक्षा संदर्भात समाज माध्यमातून परीक्षार्थी लक्ष्मणराव ढोबळे यांच्या संदर्भात ज्या बातम्या प्रसारित झाल्या त्या पाहता ही बाब अतिशय गंभीर असून विद्यापीठाच्या काही गोपनीय गोष्टीचा भंग झाल्याने विद्यापीठाची प्रतिमा समाज मनात उंचावण्याच्या ऐवजी ती ढासळतानाचे चित्र दिसत आहे. परीक्षार्थी म्हणून लक्ष्मण ढोबळे याना जी एक विशेष ट्रीटमेंट देण्यात आली, विशेष केंद्राची नियुक्ती करण्यात आली त्याची तसेच अशा अनेक किती लोकांना स्वतंत्र परीक्षा केंद्र देऊन विशेष ट्रीटमेंट दिली तसेच विद्यापीठाच्या नियमावलीत अंपगत्वाचे शासकीय रुग्णालयाचे सर्टिफिकेट देण्याऐवजी खाजगी डॉक्टर यांचे देण्यात आले. अशा सर्व घटनांची सखोल चौकशी करावी आणि या घटनांमुळे विद्यापीठाची समाजात असलेली प्रतिमा खराब होत चाललेली आहे ती बदनामी थांबवण्यासाठी प्रशासनाने स्वतः लक्ष घालून सदर प्रक्रियेमध्ये समाविष्ट असणाऱ्या विद्यापीठातील कर्मचारी तसेच ज्या अधिकाऱ्याच्या आदेशानुसार ही कृती केली गेली त्या सर्वांवरती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. परीक्षार्थी लक्ष्मण ढोबळे यांना परीक्षेतून बेदखल करण्यात यावे.तसेच त्यांना गुणवत्ता धारक लेखनिक उपलब्ध करून देणाऱ्या मार्गदर्शकाची गाईडशीप रद्द करण्यात यावी आणि विद्यापीठाची बदनामी थांबवावी अन्यथा आम्ही प्रशासनाविरोधात कोर्टात जाऊ असा कडक इशारा मा.गणेश डोंगरे, अधिसभा सदस्य, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांनी विद्यापीठ प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.