डीजे डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करावा…पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी…
श्री. गणेशोत्सव दि. ०७/०९/२०२४ ते दि. १७/०९/२०२४ या कालावधीत सर्वत्र संपन्न होणार आहे. श्री. गणेशोत्सव २०२४ अनुषंगाने दि. ०२/०९/२०२४ रोजी मा. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय शांतता कमीटी बैठक पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथे घेण्यात आली. त्यामध्ये सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस दला मार्फत अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी खालीलप्रमाणे सुचना दिल्या आहेत…
१) ज्या गावात एक गाव एक गणपती संकल्पना राबवीली जाईल अशा गावांना जिल्हा पोलीस प्रशासनामार्फत प्रशस्ती पत्र देण्यात येईल.
२) पोस ठाणे स्तरावर पोलीस ठाणे हददीतील प्रथम तीन उत्कृष्ठ सार्वजनीक गणेश मंडळांना बक्षीस देण्यात येईल.
३) उपविभाग स्तरावर उपविभागातील प्रथम तीन उत्कृष्ठ सार्वजनीक गणेश मंडळांना बक्षीस देण्यात येईल. ४) सर्व उपविभागातील प्रथम तीन उत्कृष्ठ सार्वजनीक गणेश मंडळांना पैकी तीन उत्कृष्ठ मंडळांना जिल्हा
स्तरावर बक्षीस देण्यात येईल.
५) पर्यावरण पुरक व डीजे डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करावा.
६) प्रत्येक सार्वजनीक मंडळांनी किमान ०१ सीसीटीव्ही कॅमेरा लावणेबाबत सुचना देण्यात आली आहे.
७) ज्या शहरामध्ये/ गावामध्ये एकाच दिवशी ईद ए मिलाद व गणेश मंडळाच्या मिरवणुका निघणार आहेत अशा ठिकाणी हिंदू व मुस्लिम बांधवांनी समन्वय ठेवून मिरवणुका काढाव्यात. जेणे करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.
८) सदर उत्सवामध्ये जास्तीत जास्त सामाजीक उपक्रम राबवावेत. उदा. वृक्षारोपन, रक्तदान
सदर बैठकी करीता मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी श्रीमती मोनिका सिंग ठाकुर, उपविभागीय पोलीस अधीकारी श्री. देवळेकर, श्री. यामावार, श्री. भोसले व जिल्हयातील सर्व पोलीस अधिकारी, शांतता कमिटीचे सदस्य, सार्वजनीक गणेश मंडळाचे अध्यक्ष हे हजर होते. सदर मिटींगचे सुत्रसंचालन व आभार पोनि श्री. नामदेव शिंदे यांनी मांडले