सोलापुरात सार्वजनिक शांतता राहावी यासाठी इम्रानसह दोघांना केले तडीपार….
घरफोड्यासह विविध गंभीर गुन्हे असलेल्या तिघांना दोन वर्षांसाठी सोलापूरसह धाराशिव जिल्ह्यातून मंगळवारी तडीपारीचा आदेश बजावला. विनोद शिवानंद पायमल्ले (वय १९, रा. समाधाननगर, अक्कलकोट रोड, सोलापूर), इम्रान अफसर फुलारी (वय २३, महादेव मंदिरामागे, वडापूर, ता. द. सोलापूर), जुबेर नासीर शेख (वय २८, रा. पीसीएमसी कॉलनी, पुणे, सध्या देसाईनगर, शांती नगर, नई जिंदगी, सोलापूर) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत…
यातील विनोद पायमल्ले याच्याविरुद्ध २०२३ व २०२४ या कालावधीत साथीदारासह घातक शस्त्र बाळगून नागरिकांना वेठीस धरून मारहाण करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध
एमआयडीसी पोलिस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये तडीपार प्रस्ताव पोलिस उपायुक्तांना सादर करण्यात आला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. त्यानुसार त्याला पुणे येथे सोडण्यात आले. इम्रान फुलारी व जुबेर नासीर शेख या दोघांनाही सोलापूर, धाराशिव जिल्ह्यातून तडीपारीचा आदेश बजावून त्यांना पुण्यात सोडण्यात आले