सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक
“बॅड टच गुड टच” महिला प्रबोधन ;मध्यवर्ती श्रीगणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम
बदलापुर प्रकरणानंतर संपुर्ण देशभरात महिलांसाठी असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालेलं आहे यासाठी शालेय विद्यार्थीना “बॅड टच गुड टच” या विषयावर ज्ञानप्रबोधीनी शाळेत सार्वजनिक मध्यवर्ती श्रीगणेशोत्सव मंडळाच्यावतीने विद्यार्थीनींसाठी प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते याचे प्रमुख वक्त्या डाॅ.माधवी रायते हे होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर शोभाताई बनशेट्टी हे होते तर प्रमुख उपस्थिती रोहिणी तडवळकर,ज्ञानप्रबोधीनी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुनीताताई चकोत,मध्यवर्ती मंडळ उत्सव अध्यक्ष विनायक महिंद्रकर,ट्रस्टी अध्यक्ष बसवराज येरटे,ट्रस्टी गौरव जक्कापुरे,प्रसिद्धीप्रमुख शिवानंद येरटे ,अमर कुलकर्णी यांची उपस्थिती होती