बांधकाम कामगारांचे बेकायदेशीर शिबीरे व ठोकण वाटप पध्दत बंद करा. – संयुक्त कामगार आघाडीचे अर्धनग्न आंदोलन…
सोलापूरातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या योजनेत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि गृह उपयोगी वस्तु (संच) वाटप करणारे ठेकेदार यांच्याकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व मनमानी कारभार चालू आहे. यात बांधकाम कामगारांकडून हजार ते दीड हजार पैसे घेऊन कामकाज केले जाते आणि केवळ सोलापूर जिल्ह्यात 2 लाख कामगारांची नोंदणी झालेली आहे. यावरून महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या संयुक्तपणे सुरू असलेला बांधकाम कामगार योजनेत कोट्यावधी रुपयांचे भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते. म्हणून सदर भ्रष्टाचार रोखण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेनेचे विष्णु कारमपुरी (महाराज), सह्याद्री कामगार संघटनेचे बालाजी चराटे, बहुजन पॅत्थर सेनेचे गणेश बोड्डू, संघर्ष कामगार संघटनेचे अंगद जाधव व भ्रष्टाचार विरोधी संघटनेचे सुहेल शेख या संघटनांनी एकत्रित येऊन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.
शासन वप्रशासनाकडून होत असलेल्या भ्रष्टाचार रोखण्यासाठी व बांधकाम कामगारांची पिळवणूक व लुट थांबविण्यासाठी 30 सप्टेंबर 2024 रोजी सहाय्यक कामागर आयुक्तांना बांधकाम कामगार शिबीरे व ठोकण वाटप पध्दत बंद करण्याचे निवेदन दिले. परंतु सहाय्यक कामगार आयुक्तांकडून कुठलीही कार्यवाई झाली नाही. म्हणून दि. 07/10/2024 सोमवार रोजी विष्णु कारमपुरी (महाराज), बालाजी चराटे, गणेश बोड्डू, अंगद जाधव, सुहेल शेख यांच्या नेतृत्वाखाली अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलक कामगारांनी बंद करा – बंद करा – ठोकण वाटप बंद करा, संयुक्त कामगार आघाडीचा विजय असो, सहाय्यक कामगार आयुक्तांचा धिक्कार असो, नही चलेगा – नही चलेगा – ठेकेदार की दादागिरी नाही चलेगा, हमसे जो ठकराये गा – मिठ्ठी में मिल जाये गा, गरीब बांधकाम कामगारांकडून पैसे लुटणाऱ्या हरामखोरांना अटक करा, आमच्या मागण्या मान्य करा – नाहीतर खुर्च्या खाली करा, कोण म्हणतय करणार नाही – केल्या शिवाय सोडणार नाही, निष्क्रीय कामगार आयुक्तांचा धिक्कार असो, कामगार मंत्री – हाय – हाय, कामगार आयुक्त – हाय – हाय, मुख्यमंत्री – हाय – हाय, उपमुख्यमंत्री – हाय – हाय, फडणवीस – हाय – हाय, अजित पवार – हाय – हाय. अशा घोषणा दिल्या आणि ठोकण पध्दती बंद व ठेकेदारी बेकायदेशीर शिबीरे बंद न झाल्यास मा. मुख्यमंत्री यांना सोलापूर दौऱ्यात काळे झेंडे दाखविण्यात येईल. असाही इशारा संयुक्त कामगार आघाडीच्या वतीने देण्यात आले.
सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता संयुक्त कामगार आघाडी आंदोलनात विष्णु कारमपुरी (महाराज), अंगद जाधव, गणेश बोड्डू, बालाजी चराटे, सुहेल शेख, वैशाली बनसोडे यांनी शासनाविरुध्द भ्रष्टाचाराचे जोरदार प्रहार केला. आणि बांधकाम कामगारांना न्याय न देणाऱ्या सरकारला येणाऱ्या निवडणुकीला त्यांची जागा दाखवू असेही जाहिर केले.
विष्णु कारमपुरी (महाराज), अंगद जाधव, गणेश बोड्डू, बालाजी चराटे, सुहेल शेख यांच्या नेतृत्वाखली झालेल्या अर्धनग्न आंदोलनात रेखा आडकी, राधिका मिठ्ठा, लक्ष्मीबाई ईप्पा, विठ्ठल कुऱ्हाडकर, शिवा ढोकळे, गणेश म्हंता, गुरूनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, ओंकार चराटे, आदित्य भोसले, पवन कोळी, दत्ता कलाटे, प्रशांत जक्का, लहु गायकवाड, जयजीद देवकते, विनय बोड्डू, सोहेल जागीरदार, सपना गदघाटे, दीपक दुधाळे, हेमंत दवळशंकर, सिंकदर मनीयार, सादीक शेख, जुब्बेर शेख, केदार दवखुळे, भोळाशंकर अटकर, सतीश असादे, अलका जमदाडे, नाभिका लोखंडे यांच्यासह बांधकाम कामगार बंधु – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी आंदोलनात आलेल्या बंधु – भगिनींचे आभार मानले. आणि पुढील आंदोलनात सहभाग होण्यासाठी आवाहन केले.