सोलापूर बातमीमहाराष्ट्रराजकीयसोलापूर राजकीय

आ. सुभाष देशमुख यांचे कार्यकर्त्यांना आवाहन विजयाबद्दल पदाधिकार्‍यांसह जनतेचे मानले आभार

बाजारसमितीसह सर्व निवडणुका जिंकण्यासाठी कामाला लागा

कार्यकर्त्यांनी अहारोत्र काम केल्याने आपला विजय झाला आहे. आता कार्यकर्त्यांची वेळ आली आहे. बाजार समिती, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या कार्यकर्त्यांसाठी असणार्‍या निवडणुका आहेत. आतापासूनच सर्वांनी कामाला लागावे. सर्वांना मी मदत करतो, या सर्व निवडणूक मायक्रो प्लॅनिंगने लढून निश्‍चित जिंकू असा आत्मविश्‍वास आ. सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला.
बुधवारी कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी आ. सुभाष देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस मनिष देशमुख,विधानसभा प्रमुख हनुमंत कुलकर्णी, नियोजन समिती सदस्य डॉ चनगोंडा हवीनाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. आ. देशमुख पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत स्वपाक्षीय विरोधकांनी विरोधी कारवाया केल्या, मला उमेदवारी देऊ नका असे वरिष्ठांना आव्हान केले होते. मात्र मी सुडाचे राजकारण करणार नाही. ज्यांनी ज्यांनी विरोधी कारवाया केल्या त्यांचे देखील आभारी आहे. नकारात्मक कधीच मी बोलत नाही, सकारात्मक चर्चा करत असतो. प्रत्येक निवडणूक वेगळी असते. यामुळे विजय डोक्यात जाऊ देऊ नका, विजयासाठी कारणे अनेक असतात. अदृश्य हाताने, विरोधी पक्षाच्या लोकांनीपण मदत केली आहे. त्यामुळेच इतके मताधिक्य मिळाले. येणारा काळात सावध राहून काम करायाचे आहे. आता कार्यकर्त्यांसाठी मी लढणार आहे. सर्वांनी जबाबदारी वाटून घ्यावी, मायक्रो प्लॅनिंगने पुढील काम करा, महापालिका, बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्व निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत. त्यासाठी सर्वांनी कामाला लागावे. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकनिष्ठ राहून काम करावे, निष्ठेचे फळ नक्की मिळते. ज्यांना ज्यांना स्थानिक निवडणूक लढावायच्या आहेत त्यांनी प्लॅनिंग करावे, मी त्यांच्या मागे उभा आहे, असे आ. देशमुख म्हणाले. यावेळी मंडळ प्रभारी हेमंत पिंगळे, दिलीप पतंगे सिद्धेश्वर कोकरे, जयवंत थोरात मंडल अध्यक्ष, राम जाधव, संगप्पा केरके, अर्जुन जाधव, आनंद बिराजदार, महिला मंडल अध्यक्षा वृषाली पवार, अंबिका पाटील, निलिमा शितोळे, नि लिमा हिरेमठ यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट
मतदारसंघातील सीना भिमा जोड कालवा, वडापूर बॅरेजस, पर्यटन विकास, देगांव कॅनॉल, शिरवळ तलावात पाणी आणणे, मंद्रूप एमआयडीसी हे महत्वाचे विषय तात्काळ मार्गी लावणार आहे. सिंचनातून तालुक्याचा विकास, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पडलेल्या पाण्याचा थेंब अडवण्यासाठीच काम करू, रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करायचे आहेत, असेही आ. देशमुख म्हणाले. शिक्षणातून तालुक्याचा विकास, शासकीय योजनेचा लाभ, घ्यावा जिथे लागेल तिथे मदत करायला तयार आहे, असेही ते म्हणाले.
चौकट
जनतेची उतराई विकासकामातून करणार
जनतेने विक्रमी मताधिक्य दिलेले आहे. देव, देश, धर्मासाठी जे काही करता येईल ते प्रभावीपणे काम करायचे आहे. देश, राज्य, जिल्हा, तालुका व माझे गाव समृद्ध करायचे आहे. मिळालेल्या यशाबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो. आपण दिलेल्या मतांची उतराई म्हणून मी पुढील पाच वर्ष विकासाचे राजकारण करून हा मतदारसंघ राज्यात आदर्शवत करणार असल्याचे आ. देशमुख म्हणाले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel