Solapur court matterक्राईमन्यायालय निर्णयसोलापूर क्राईमसोलापूर बातमीसोलापूर सामाजिक

सोलापुरातील चावडी मस्जिद चे इमाम यांना तू वक्फ अधिकारी यांना का भेटला म्हणून तलवारीने व चाकूने मारहाण करून केल्याप्रकरणी निर्दोष मुक्त करण्याचे आदेश

सोलापुरातील चावडी मस्जिद चे इमाम यांना तू वक्फ अधिकारी यांना का भेटला म्हणून तलवारीने व चाकूने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी दाखल प्रकरणांमध्ये मधील आरोपी नामे नजमुन साकीब म. याकूब मंगलगिरी, अब्दुल अजीज अब्दुल रौफ शेख, अब्दुल रुक्मुद्दीन शिलेदार, इस्माईल महमूद शेख, ताजुद्दीन निजामुद्दीन आबादीराजे सर्व राहणार- सोलापूर यांची निर्दोष मुक्त करण्याचे आदेश सोलापूर येथील मुख्य न्याय दंडाधिकारी श्री विक्रम सिंह भंडारी यांनी दिले.

यात घटनेची थोडक्यात हाकिकत अशी आहे की,

फिर्यादी अब्दुल रजाक नजीर अहमद शेख वय 34 वर्ष राहणार उत्तर सदर बाजार सोलापूर हे सोलापूर येथील जगदंबा चौकामध्ये असलेल्या चावडी मस्जिद मध्ये नमाज पठण करण्याचे व धार्मिक प्रवचन देण्याचे काम करतात. दिनांक 26 सप्टेंबर 2021 रोजी वक्फ बोर्डाचे सोलापूर येथे मीटिंग होती व सदर मीटिंग करिता वक्फ बोर्डाचे औरंगाबाद येथून काही अधिकारी आले होते त्यावेळी फिर्यादी याने वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली तसेच मस्जिद मध्ये बोर्डाचे अधिकारी आल्यानंतर त्यावेळेस सुद्धा त्यांची भेट घेतली होती.

सदरचा राग मनात धरून रात्री 01:45 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे त्याचे मित्र मोहम्मद मोहसिन इकबाल शेख यांच्या सोबत चर्चा करून त्यांना सोडण्याकरिता घराबाहेर आले असताना आरोपींनी संगणमत करून बेकायदेशीर जमाव जमवून हातामध्ये चाकू व तलवार घेऊन फिर्यादीच्या दंडावर व डोक्यावर मारहाण करून जखमी केले. त्याचवेळी फिर्यादीची पत्नी ही सोडविण्यास आली असता तिला देखील ढकलून देऊन तिच्या गळ्यातील सोन्याचे हार ओढून मारहाण करून पळून गेले होते. सदर घडलेल्या घटनेची फिर्याद फिर्यादी अब्दुल रजाक नजीर अहमद शेख यांनी सदर बाजार पोलीस स्टेशन येथे दिल्याने आरोपीच्या विरुद्ध भादवि कलम 324, 143, 146, 147, 148, 149, तसेच भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली होती व सर्व आरोपींच्या विरुद्ध तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मुकेश जी गायकवाड यांनी सोलापूर येथील न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले होते.

सदर खटल्याची सुनावणी सोलापूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी श्री विक्रमसिंह भंडारी यांच्या कोर्टामध्ये झाली सरकार पक्षातर्फे जखमी फिर्यादी फिर्यादीची पत्नी व नेत्र साक्षीदार अशा साक्षीदारांची जबाब घेण्यात आले सदर खटल्यामध्ये अंतिम युक्तिवाद करत असताना आरोपींच्या विरुद्ध कोणताही सबळ पुरावा नसल्याचे तसेच आरोपींना खोट्या केस मध्ये गुंतविले असल्याचा युक्तिवाद केला असता सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून मुख्य न्याय दंडाधिकारी श्री विक्रमसिंह भंडारी यांनी आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. सदर प्रकरणांमध्ये आरोपी तर्फे अँड रियाज एन शेख तर सरकार पक्षातर्फे अमर डोके यांनी काम पाहिले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel