समता सैनिक दलाच्या वतीने सोनबा येलवे पाणपोईचे उद्घाटन संपन्न…

महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह या वर्धापन दिनाच्या निमित्ताने समता सैनिक दल शहर जिल्हा सोलापूरच्यावतीने समता परिवार न्यू बुधवार पेठ सोलापूर येथे सोनबा येलवे पाणपोईचे उद्घाटन सलग 26 व्या वर्षी संपन्न झाले.शाक्य संघाचे अध्यक्ष अंगद मुके, समता सैनिक दलाचे जिओसी अंबादास कदम, बौद्ध साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते या पाणपोईचे उद्घाटन थाटात संपन्न झाले. या पाणपोईची सुरुवात निवृत्त पोलीस उपनिरीक्षक कालकतीथ केरू जाधव यांनी 2000 साली सुरू केलेली होती .या पाणपोईला आज 26 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या पाणपोईच्या उद्घाटन प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या सुमित्रा केरू जाधव त्याचप्रमाणे त्यांचे सर्व कुटुंबीय .समता सैनिक दलाचे संभाजी तळभंडारे, मुकुंद चंदनशिवे ,समता सैनिक दलाचे महासचिव अनिल जगझाप ,रत्नदीप कांबळे, विनोद केरू जाधव, शाक्य संघाचे सदस्य निवृत पोलीस उपनिरीक्षक शांताराम वाघमारे ,मुंबई आकाशवाणीचे निवृत्त अधिकारी शांतिकुमार कांबळे, पत्रकार महेश गायकवाड, गौतम चंदनशिवे, कुणाल जानराव, रितेश कसबे, सत्यजित वडवराव इत्यादी मान्यवर या पाणपोईच्या उद्घाटनाला उपस्थित होते .
समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांची साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा यावेळी उचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमित्रा जाधव यांनी केले सूत्रसंचालन महासचिव अनिल जगझाप यांनी केले तर विनोद केरु जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.