सोलापूर व्याजाचे पैसे देण्यावरून सुनील बळी यांच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा…

व्याजाचे पैसे देण्यावरून सुनील बळी यांच्या विरोधामध्ये सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे परंतु गुन्हा मागे घेण्यासाठी धमकी देत असल्याची तक्रार पोलीस आयुक्तांकडे निवेदनात करण्यात आली आहे
गैर अर्जदार यांचे विरुद्ध केस दाखल केलेल्या असताना देखील माझ्यावर दबाव आणून मला वारंवार फोनवरून धमकी देत असल्याबद्दल हुसेन अजमुद्दिन मुजावर राहणार जेऊर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे दिनांक 17 मार्च रोजी सातरस्ता येथील तळवळकर जिमच्या समोर सिद्धेश्वर आईस्क्रीम येथे ज्यूस पीत असताना सुनील बळी हा त्याच्या तीन साथीदारन समवेत तिथं आला आणि त्यानं मला पैशाची मागणी केली त्यावेळेस तुमच्या पूर्ण पैसे दिले आहेत असं सांगत असताना तू मेरे साथ चल असं म्हणत त्याने मला त्याच्यासोबत घेऊन गेला सुनील बळी यांना त्याच्या मोटरसायकलीवर बळजबरीने बसवून नई जिंदगी इथल्या वीटभट्टी इथे घेऊन गेला आणि पुन्हा त्यांना तीन लाख रुपये पैशाची मागणी केली
माझे दोन्ही हात दोरीने बांधून मला जमिनीवर बसवलं आणि तो मला सतत पैशाची मागणी करत होता माझा भाऊ सद्दाम याला फोन करून बोलावून घेऊन त्याला देखील तीन लाख रुपयांची मागणी केली आणि देऊ शकलो नाही तर तुमचं शेत माझ्या नावावर करा अशी त्यानं दमदाटी केली आणि जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत गाडी देत नाही असं म्हणत शाईन मोटरसायकल क्रमांक एम हेच 13 सी एल 97 90 आणि विवो कंपनीचा मोबाईल त्यांना काढून घेतला त्याचे विरोधात सदर बाजार पोलीस स्टेशन इथं एफ आय आर दाखल केली आहे परंतु गैर अर्जदार राजकीय पक्षांचा दबाव आणून मला वारंवार फोन करून केस मागे घेण्यासाठी दबाव आणत असल्याचं त्यांनी पोलीस आयुक्तांना सांगितलं दरम्यान १९ मार्च रोजी आरोपी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये हजर असताना देखील पोलिसांनी आरोपीस अटक केली नाही आरोपी हा सध्या मोकाट फिरत असून माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या जीवाचा कधी घातपात करेल याचा नेम नाही त्यामुळे लवकरात लवकर आरोपी आणि त्याची इतर साथीदारांना अटक करण्यात यावी अशी विनंती हुसेन अजमुद्दिन मुजावर राहणार जेऊर तालुका अक्कलकोट यांना पोलीस आयुक्तांना अर्जाद्वारे केली आहे