जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूरसोलापूर बातमीसोलापूर महानगरपालिकासोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक

गोपीचंद पडळकरांच्या सभेत धनगर युवकाने आरक्षणाचा जाब विचारला…

पडळकर म्हणाले सध्या तरी आपण जयंतीबाबत बोलू

इतर धनगर बांधवानी समजूत घालून युवकास शांत केले

सोलापूर:भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे गुरुवारी दुपारी सोलापूर दौऱ्यावर आले होते.अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त धनगर समाज बांधवांसोबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेतली.सोलापूर जिल्ह्यातील धनगर बांधव जयंतीबाबत चर्चा करण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत बैठक करत होते.बैठक सुरू असताना,धनगर समाजाचे युवक शेखर बंगाळे यांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला.सरकारने आरक्षणाचा गाजर दाखवला असे सांगताच,31 मे अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांनी धनगर आरक्षणचा विषय मार्गी लावावा अशी मागणी शेखर बंगाळे यांनी केली आहे. गोपीचंद पडळकर समर्थकांनी आरक्षणाचा विषय आत्ता नको,सध्या फक्त आपण अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीबाबत ,आणि जयंतीच्या तयारीबाबत बोलू असे सांगत,शेखर बंगाळे यांना खाली बसविले.यावेळी एकच गोंधळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती.धनगर समाजातील युवक शेखर बंगाळे यांनी शेवटपर्यंत धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न विचारत गोपीचंद पडळकर यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.बैठकीत गोंधळसदृश परिस्थिती निर्माण होऊ लागल्याने गोपीचंद पडळकर समर्थकांनी माध्यम प्रतिनिधीना बाहेर काढले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel