सोलापूर धार्मिकसोलापूर बातमीसोलापूर सामाजिक
भर चौकात शौकत पठाणव एमआयएम कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या दिल्या घोषणा…

मुस्लिम बांधवाचे काळ्या फिती लावून नमाज पठण
भर चौकात शौकत पठाणव एमआयएम कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या दिल्या घोषणा
सोलापूर:दक्षिण काश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे.सोलापूर शहरातील मुख्य मशिदींमध्ये मुस्लिम बांधवानी काळ्या फिती लावून नमाज पठण केली.भारताच्या स्वसंरक्षणासाठी प्रार्थना केली.नमाज नंतर मुख्य चौकात येऊन पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.26/11 ला मुंबईत जो हल्ला झाला होता,त्यामध्ये अनेक मुस्लिमानी प्राण गमावला होता.आतंकवाद्यांना जात नसते,त्यांना फक्त दहशत निर्माण करावयाची असते,तसेच पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात मुस्लिम व्यक्तीचा देखील समावेश आहे. अशी प्रतिक्रिया एमआयएमचे नेते शौकत पठाण यांनी दिली आहे.