पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्हा दौरा…

राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री, तथा पालकमंत्री जयकुमार गोरे हे गुरूवार दि. 12 जून 2025 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
गुरूवार सकाळी 6.50 वा. सोलापूर रेल्वेस्थानक येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 7.05 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव . सकाळी 10.45 वा. शासकीय विश्रामगृह येथून हॉटेल बालाजी सरोवर प्रीमिअर कडे प्रयाण. सकाळी 10.55 हॉटेल बालाजी सरोवर प्रीमिअर येथे आगमन व 11.00 वा. विकसित भारताचा अमृतकाल संदर्भात पत्रकार परिषदेस उपस्थिती. त्यानंतर सकाळी 11.30 वा भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष (ग्रामिण व शहर ) व जिल्ह्यातील सर्व भाजपा मंडल अध्यक्ष यांचे समवेत बैठकीस उपस्थिती.
दुपारी 12.45 वा. सोलापूर येथून पंढरपूर कडे प्रयाण. दुपारी 02.00 वा. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर देवस्थान समिती सभागृह ,पंढरपूर येथे आगमन व श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर देवस्थान समिती यांचे समवेत आषाढीवारीच्या अनुषंगाने बैठकीस उपस्थिती. दुपारी 02.45 वा. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर देवस्थान समिती सभागृह येथून शासकीय विश्रामगृह पंढरपूर कडे प्रयाण. 03.00 वा.शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव व नंतर सोयीनुसार बोराटवाडी जिल्हा सातारा कडे प्रयाण करतील.



