सोलापुरात एकाच रात्रीत 3 ऑर्केस्ट्रा बारवर धाड: 91 आरोपींवर गुन्हे, 1.21 कोटींचा मुद्देमाल जप्त…

एकाच रात्रीत ३ ऑर्केस्ट्राबार पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई
कॉसिनो बार, कोंडी, सुखसागर बार, भोगाव व संन्ट्रो बार, बळेवाडी बार्शी वर छापे
१,२१,८३,२३५/- रूपयांचा मुद्देमाल जप्त, ९१ आरोपींविरूध्द गुन्हे दाखल
मा. श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांना ऑर्केस्ट्रा बारचा
परवाना घेवून ते चालवत असताना दिलेल्या वेळेच्या नंतर बार चालू ठेवणे, ऑर्केस्ट्रा बारमध्ये काम
करणारे मुलींकडून आश्लिल हावभाव, नृत्य करण्यास भाग पाडणे, पैश्यांची उधळण करणे असे प्रकार
होत असल्याबाबत माहिती प्राप्त होती. सदरचे कृत्य म्हणजे महाराष्ट्र हॉटेल, उपहारगृह आणि मद्यपान
कक्ष (अश्लिल नृत्यांवर प्रतिबंध व महिलांच्या प्रतिष्ठंचे संरक्षण) अधिनिमयान्वये गुन्हा असल्याने या
ऑकेस्ट्राबर कायदेशीर कारवाई करण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली होते….
सदर पथकांनी दिनांक १७/०४/२०२६ रोजी पहाटे १) सोलापूर तालुका पोलीस ठाणेच्या
हद्दीत मौजे कोंडी, ता. उत्तर सोलापूर येथील कसिनो ऑर्केस्ट्रा बार २) सोलापूर तालुका
पोलीस ठाणेच्या हद्दीतील मौजे खेड, ता. उत्तर सोलापूर येथील
बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे बळेवाडी येथील
सुखसागर ऑर्केस्ट्रा बार ३)
संन्ट्रो ऑर्केस्ट्रा बार” येथे छापा
कारवाई करण्यात आली. त्यामध्ये तिन्ही ठिकाणी हॉटेलचे मालकांच्या संगनमताने मॅनेंजर हे महिलांना
अश्लिल हावभाव व नृत्य करण्यासाठी भाग पाडत असून तेथे आलेले गि-हाईक हे भारतीय चलानाच्या
नोटांचे आकाराचे नोटासदृश्य कागद उडवताना व नृत्य करताना मिळून आले आहेत. त्यांना कायदेशीर
कारवाई करून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची माहिती पुढील प्रमाणे
१) कसिनो ऑर्केस्ट्रा बार, कोंडी येथील बारवर सपोनि अनिल सनगल्ले यांच्यासह पोलीस अंमलदार गणेश पाटील, श्रीदेवी प्रचंडे व आरसीपीच्या पथकाने दिनांक १७/०४/२०२६ रोजी छापा कारवाई केली असता तेथे बारचा मालक प्रभाकर केशव काळे याचे संमत्तीने मॅनेजर अमोल शिवाजी चव्हाण व माधव सामल अधिकारी यांच्या सांगण्यानुसार ११ पिडीत महिला या अश्लिल हावभाव करून नृत्य करताना आढळून आले. तसेच तेथे २३ ग्राहक मिळूनआले असून त्यांचेकडून ४६,३१,०००/- रूपये
किंमतीच लॅपटॉप, अम्प्लीफायर, साउंड बॉक्स, साउंड मिक्सर, रोख रक्कम व वाहने असा मुद्देमाल
जप्त करण्यात आलेला आहे. याबाबत सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात
आलेला आहे.
२) सुखसागर ऑर्केस्ट्रा बार, खेड येथील बारवर परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक यांच्यासह
पोलीस अंमलदार दशरथ गोरे व आरसीपीच्या पथकाने दिनांक १७/०४/२०२६ रोजी छापा कारवाई
केली असता तेथे बारचा मालक मिथून सुरेश राठोड, याचे संम्मतीने मॅनेजर वैभव मल्लीकार्जुन
शिवलगी याच्या सांगण्यानुसार ७ पिडीत महिला या अश्लिल हावभाव करून नृत्य करताना आढळून
आले. तसेच तेथे १८ ग्राहक मिळूनआले असून त्यांचेकडून १८,००,९८०/- रूपये किंमतीच लॅपटॉप,
अम्प्लीफायर, १० साउंड बॉक्स, साउंड मिक्सर, रोख रक्कम व ९ वाहने असा मुद्देमाल जप्त
करण्यात आलेला आहे. याबाबत सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला
आहे.
३) सेन्ट्रो ऑर्केस्ट्रा बार, बळेवाडी येथील सेन्ट्रो बारवर सपोनि कारंडे यांच्यासह आरसीपीच्या
पथकाने दिनांक १७/०४/२०२६ रोजी छापा कारवाई केली असता तेथे बारचा युवराज अर्जुन बारंगुळे
व समाधान प्रल्हाद पाटील याचे संम्मतीने मॅनेजर अमोल प्रल्हाद पाटील याच्या सांगण्यानुसार १८
महिला या अश्लिल हावभाव करून नृत्य करताना आढळून आले. तसेच तेथे ०९ ग्राहक मिळून आले
असून त्यांचेकडून ५७,५१,२५५ /- रूपये किंमतचे साउंड सिस्टम, वाहने, मोबाईल व १ तलवार
असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. याबाबत बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
अशा प्रकारे एकूण ३ ऑर्केस्ट्रा बार वर करण्यात आलेल्या कारवाईमध्ये ९१ आरोपीवर
३ गुन्हे दाखल करण्यात येवून १,२१,८३,२३५ /- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, मा. श्री. प्रितम
यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विशाल नवले, परीविक्षाधीन पोलीस
उपअधीक्षक, श्री. अनिल सनगल्ले, सहायक पोलीस निरीक्षक, श्री. देवीदास कारंडे, सहायक पोलीस
निरीक्षक, पोलीस अंमलदार दशरथ गोरे, गणेश पाटील, श्रीदेवी परचंडे यांच्यासह दंगा पथकातील
पुरूष व महिला अंमलदार यांनी बजावली आहे…



