सोलापूर बातमीमहाराष्ट्रराजकीयसोलापूर राजकीय

खा.प्रणिती शिंदेंनी राहुल गांधीच्या घरासमोरचा रस्त्याची काळजी करावी…

सोलापूर:राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जय कुमार गोरे गुरुवारी सायंकाळी सोलापूर शहरातील एका सामुदायिक विवाह सोहळ्यात उपस्थित होते. माध्यमांना प्रतिक्रिया देताना जय कुमार गोरे यांनी अजित पवारांचे चिरंजीव जय अजित पवार यांना टोला लगावला. जय पवार यांनी बारामतीत जनता दरबार घेतला होता. जनता दरबाराला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. जय पवार यांनी बारामती मधून सांगीतले,2029 साली सुनेत्रा पवार महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री असतील. ग्रामविकास मंत्री जय कुमार गोरेनी जय पवारांना टोला लगावला मुख्यमंत्री व्हायला खूप मोठा जनाधार लागतो, आमदाराची संख्या, आणि पाठिंबा लागतो.2029 मध्ये देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील असा विश्वास जय कुमार गोरे यांनी सोलापूर येथे व्यक्त केला.

खा.प्रणिती शिंदेंनी राहुल गांधीच्या घरासमोरच्या रस्त्याची काळजी घ्यावी-
सोलापुरात मोहोळ ते वळसंग महामार्ग 740 कोटी रुपयांच मंजूर झालं आहे.या रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजप आमदार सुभाष देशमुख आणि काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यात श्रेयवाद सुरू आहे. यावर भाजप नेते व ग्रामविकास मंत्री जय कुमार गोरेनी खा. प्रणिती शिंदेंना टोला लगावला आहे. त्या दिल्लीत जास्त असतात, त्यामुळे त्यांनी राहुल गांधीच्या घरासमोरच्या रस्त्याची काळजी घ्यावी.

सुशिलकुमार शिंदेनी राजीनामा दिला होता का?-
सुशील कुमार शिंदे हे देशाचे केंद्रीय गृहमंत्री होते.त्यांच्या कार्यकाळात अनेक बलात्कार सारख्या घटना घडल्या होत्या. दिल्लीत निर्भया सारखा मोठा कांड झालेला होता. त्यावेळी सुशिलकुमार शिंदेंनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता का असा सवाल ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जय कुमार गोरेनी खा. प्रणिती शिंदेच्या वक्तव्याबाबत उपस्थित केला आहे. खा. प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन नसरापूर प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेऊन देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel