solapurpoliceमहाराष्ट्रसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

सोलापूर : विडी घरकुल येथे घरफोडी; कुलूप तोडून 23 हजारांचा लॅपटॉप लंपास

सोलापूर: राहत्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत लाकडी कपाटात ठेवलेला 23 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेल्याची घटना विडी घरकुल परिसरात घडली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

 

दि. 13 मार्च 2026 ते 14 मार्च 2026 या दरम्यान फिर्यादी अनिल रविंद्र सोमा (रा. 15 एल आय जी, विडी घरकुल, सोलापूर) यांच्या घरी ही चोरी झाली.

 

हकीकतीनुसार, अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील लाकडी कपाटात ठेवलेला सिल्वर रंगाचा, इंटेल कंपनीचा आय 3, 12 जनरेशनचा लॅपटॉप फिर्यादीच्या संमतीवाचून मुद्दाम लबाडीने चोरून नेला. चोरीस गेलेल्या लॅपटॉपची किंमत 23,000 रुपये आहे.

 

याप्रकरणी दि. 9 जून 2026 रोजी रात्री 8.23 वा. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गु.र.नं. 569/2026 नुसार भा.न्याय संहिता कलम 305(अ), 331(3), 331(4) प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

तपास पोहेकॉ/402 निंबाळ करीत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
404 Not Found