पोलिस निरीक्षक इलियास सय्यद यांना भारत सरकारचा अति उत्कृष्ट सेवा पुरस्कार…

पोलीस निरीक्षक इलियास सय्यद यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अत्यंत निष्ठा आणि समर्पण वृत्ती दर्शविल्याने भारतीय स्वतंत्र दिना निमित्त भारत सरकारचा अती उत्कृष्ट सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पोलिस निरीक्षक इलियास सय्यद यांना २२१ बक्षिसे आणि ‘डीजीपी इन्सिग्निया’ (DGP Insignia) प्राप्त झाले आहे. अत्यंत शिस्तप्रिय अधिकारी असून हत्या, दरोडा आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात त्यांचे विशेष नैपुण्य मिळाले. पोलिस निरीक्षक इलियास यांच्या कामगिरीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे महालक्ष्मी मंदिर परिसरातून २८ बांगलादेशी नागरिकांना केलेली अटक व त्यांनी केलेल्या जलद तपासामुळे अवघ्या चार दिवसांत सर्व आरोपींना शिक्षा झाली. बांगलादेशी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवण्यात यश आले. कोल्हापूरच्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच घडली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात तपास करताना त्यांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली, घरफोडीचे १९ अतिरिक्त गुन्हे उघडकीस आणले आणि २५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. ५ बेकायदेशीर पिस्तूलही जप्त केली. त्यांनी बहुचर्चित गगनबावडा पोलीस ठाण्यातील खुनाचा तपास केला, ज्यामध्ये न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. इलियास सय्यद यांनी १२० ई-चलान (e-challans) जारी करून १.३० कोटी रुपयांचा दंड वसूल केला आणि ४,५०० नवीन भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना कायद्याचे प्रशिक्षण दिले.तपासातील उत्कृष्ट कामगिरी आणि प्रशिक्षण देण्याच्या क्षमतेचा त्यांचा निर्दोष आलेख पाहता, त्यांना स्वातंत्र्यदिन २०२६ च्या निमित्ताने भारत सरकार यांचे अति उत्कृष्ट सेवा पदक पोलीस निरीक्षक इलियास सय्यद यांना प्राप्त झाले आहे.



