सोलापूरात पैशाच्या वाटणीसाठी सख्ख्या भावाने भावाच्या डोळ्यावर लोखंडी सळईने वार!

सोलापूर – पैशापुढे रक्ताचं नातंही फिकं पडतं याचा थरकाप उडवणारा प्रकार विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. शेतातून आलेल्या पैशाच्या वाटणीसाठी मोठ्या भावाने आपल्याच सख्ख्या लहान भावावर लोखंडी सळईने जीवघेणा हल्ला केल्याची संतापजनक घटना घडली आहे.
गुन्ह्याची थरारक माहिती –
पोलीस ठाणे – विजापूर नाका पोलीस ठाणे
गु.र.नं. – ५८०/२०२६ – कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) भारतीय न्याय संहिता
घटनेची वेळ व ठिकाण – दि. १९/१०/२०२६ रोजी पहाटे ०२.०० वा. कुमठे तांडा, सोलापूर
गुन्हा दाखल वेळ – दि. १९/१०/२०२६ रोजी सायं. ७.४७ वा.
फिर्यादी – संतोष गुरप्पा चव्हाण, रा. कुमठे तांडा, सोलापूर
आरोपी – राजुदास गुरप्पा चव्हाण, रा. कुमठे तांडा (फिर्यादीचा सख्खा मोठा भाऊ)
पैशासाठी सख्खा भाऊच बनला काळ! (हकीकत)
यातील फिर्यादी संतोष चव्हाण यांच्या शेतातून काही पैसे आले होते. त्या पैशाची वाटणी मागितली या क्षुल्लक कारणावरून त्याचा सख्खा मोठा भाऊ राजुदास याने वाद घालण्यास सुरुवात केली.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि या नराधम मोठ्या भावाने रागाच्या भरात हाताने, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता त्याने हातात लोखंडी सळई घेतली आणि लहान भावाच्या डाव्या डोळ्याच्या बाजूला जोरात मारून गंभीर जखमी केले.
डोळ्यावर सळईचा वार बसल्याने संतोष हे रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळले. जर वार थोडा जरी वर लागला असता तर डोळाच निकामी झाला असता.
रक्ताच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे कुमठे तांडा परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
या घटनेप्रकरणी विजापूर नाका पोलिसांनी सख्ख्या भावाविरुद्धच गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहे.कॉ. १२०४ मणुरे हे करीत आहेत…



