solapurpoliceक्राईममहाराष्ट्रसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

“तेरी औकात क्या… तुझे खत्म करता” म्हणत रिक्षा चालकाच्या छातीत चाकू खुपसला , गुन्हा दाखल!

सोलापूर प्रतिनिधी / दि. २० – सोलापूर शहरात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले असून जोडबसवण्णा चौकात भररस्त्यात एका रिक्षा चालकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. जुन्या भांडणाच्या रागातून दोन सराईतांनी बुलेटवर येऊन जीवे मारण्याची धमकी देत थेट छातीत चाकू भोसकल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

घटनेचा थोडक्यात आढावा –
पोलीस ठाणे – जेलरोड
गुन्हा क्र. – ५६८/२०२६, कलम – १०९(१), ३५२, ३५१(२), ३(५) BNS
घटना – दि. १९ ऑक्टोबर, रात्री ९.१५ वा., जोडबसवण्णा चौक
फिर्यादी – खालिद आसिफ शेख (वय ३३, रा. साखर पेठ)
आरोपी – १) ताजोद्दीन चांदसाब शेख २) मोहसीन लियाकत चौधरी (रा. राहुल गांधी झोपडपट्टी)

प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी खालिद शेख हे न्यू गोविंद मेडिकल समोर आपल्या रिक्षामध्ये भाड्याच्या प्रतीक्षेत थांबले होते. त्याच वेळी मागील भांडणाचा वचपा काढण्यासाठी आरोपी ताजोद्दीन व मोहसीन हे बुलेट मोटरसायकलवरून तेथे आले.

आरोपींनी फिर्यादीस घेराव घालून “तेरी औकात क्या हमारे साथ झगडे करनेकी, तुझे बहुत मस्ती आई, तुझे अब जिंदा रखता नही, तुझे खत्म करता” अशी थेट जीवे मारण्याची धमकी दिली.

यानंतर आरोपी ताजोद्दीन याने कमरेला लपवून आणलेला धारदार चाकू काढून खालिद यांच्या छातीत उजव्या बाजूला सपासप वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यात खालिद हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले असता दोन्ही आरोपी बुलेटवरून फरार झाले.

या घटनेने जोडबसवण्णा चौक परिसर हादरला असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी जेलरोड पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनि पाटील हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel