खेळदेश - विदेश

KKR आणि शाहरूख खानने BCCI ला चिडवलं? ट्रॉफी जिंकल्यानंतर ‘ही’ पोज देत केलं सेलिब्रेशन

कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून आयपीएल २०२४चे विजेतेपद पटकावले. आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर केकेआर संघाने असे काही केले आहे ज्याची खूप चर्चा होत आहे. केकेआरच्या या सेलिब्रेशनमध्ये स्वत शाहरूख खानही सहभागी होता.
कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२४चे विजेतेपद पटकावले आहे. एकतर्फी विजेतेपदाच्या लढतीत केकेआरने सनरायझर्स हैदराबादचा लाजिरवाणा पराभव केला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर पहिल्याच षटकापासून कोलकाताने वर्चस्व गाजवले आणि सामन्यात एकदाही हैदराबादला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. मालक शाहरुख खानच्या या संघाने तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. हा संघ यापूर्वी २०१२ आणि २०१४ मध्ये चॅम्पियन बनला आहे. पण या विजयानंतर केकेआर संघाने शाहरूखसोबत एक आगळंवेगळं सेलिब्रेशन केलं, ज्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरत आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर फ्लाइंग किस देऊन आनंद साजरा केला. ट्रॉफी घेतल्यानंतर केकेआरचा मालक शाहरुख खानने स्वतः सर्व खेळाडूंना ही पोज देण्यास सांगितले. शाहरुखने आधी सर्वांना काय करायचं आहे ते समजावून सांगितले. यानंतर शाहरुखने स्वतः आणि टीमचे सर्व खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफने कॅमेऱ्यासमोर फ्लाइंग किस दिले आणि आनंद साजरा केला.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel