क्राईममहाराष्ट्र

MIM नेत्यावर गोळीबार… 3 गोळ्या घुसल्या शरीरात , प्रकृती चिंताजनक

महाराष्ट्रात दिवसेंदिवस खून, मारामारी , गोळीबार सारखे गंभीर गुन्हे घडतच आहे महाराष्ट्रात कायदा आणि संस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा आला आहे त्याला कारणही तसेच आहे मालेगाव येथील माजी महापौर असणाऱ्या एमआयएमच्या जिल्हाध्यक्षांवर थेट अज्ञात इस्मानी गोळीबार केला , त्या तीन गोळ्या माजी महापौर असणाऱ्या अब्दुल मलिक युनूस ईसा हे गंभीर रित्या जखमी झाले आहे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, हल्लेखोरांनी अब्दुल मलिक युनूस ईसा यांच्यावर झाडलेल्या तिन्ही गोळ्या त्यांना लागल्या आहेत. एक गोळी हाताला, एक पायाला तर एक छातीत लागली आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी नाशिकमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रात्री १ ते दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

जुना आग्रा रोडवरील ताज मॉल कॉम्पलेक्समध्ये अब्दुल मलिक युनूस ईसा हे त्यांच्या काही सहकाऱ्यांबरोबर असतानाच हा हल्ला झाला. हल्ल्यात जखमी झालेल्या मलिक यांना शहरातील द्वारकामणी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

त्यानंतर त्यांना उपचारांसाठी नाशिकमधील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

हल्ल्यानंतर मालेगावमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. सर्वत्र पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel