Solapur : पत्नीने पती विरुद्ध 420 चा केला गुन्हा दाखल..!
खोट्या सह्या करून बँकेच्या खात्यावरील ५ लाख ३९ हजार ९०१ रुपयांची रक्कम वेळोवेळी काढून घेटल्याप्रकणी पत्नीने पती विरुद्ध भादवि ४२०,४६७,४६८ प्रमाणे सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे
याबाबत अधिक माहिती अशी की खोट्या सह्या करून बँकेच्या खात्यावरील ५ लाख ३९ हजार ९०१ रुपयांची रक्कम वेळोवेळी काढून घेऊन आपली फसवणूक केल्याची तक्रार विवाहितेने पतीच्याविरुद्ध दिली आहे. सन २०१२ ते १८ या कालावधीत ओरिएंटल बैंक ऑफ कॉमर्स अहमदनगर व सोलापूर येथे हा प्रकार घडल्याचे म्हटले आहे.
सदर बझार पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदला आहे. अश्विनी अमोल गायकवाड (इंद्रधनू अपार्टमेंट, सोलापूर) यांनी फिर्याद दिली असून, पती अमोल वाल्मीक गायकवाड (रा कारंडे वरती वाडा रोड राजगुरू नगर ता.खेड जि.पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादीचे ओरिएंट बँकेमध्ये खाते आहे.