MIM च्या निर्णयाचे स्वागत… पण समाजामध्ये उपस्थित प्रश्नांची उत्तरे नेतृत्व वेईल का?-रेश्मा मुल्ला
सोलापूर मतदारसंघात एम.आय.एम. पक्षाचा उमेदवार देणार नाही अशी घोषणा पक्षाचे चे अध्यक्ष फारुख शायदी यांनी केली आहे. संविधानाच्या रक्षणासाठी आणि समाजाच्या उलेमा व मौलवी जबाबदार कार्यकत्यांशी चर्चा करून सदर निर्णय घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. एमआयएमच्या या निर्णयाचा आम्ही स्वागत करीत आहोत, पण गेली पंधरा दिवसांपासून आम्ही धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी नको व नकळत भाजपाच्या राजकारणाला साथ नको अशी भूमिका जाहीर करून पक्षाचे राजीनामे दिले होते. पण पक्ष नेतृत्वाला समाजाची मानसिकता ओळखून भूमिका जाहीर करताना एवढा उशीर का झाला हा प्रश्न अनुत्तरित आहे. यापूर्वीच आम्ही समाजाची भावना स्पष्टपणे नमूद केली होती. काही दिवसांपूर्वीच उलेमांनी व मौलवी राजकारणात लुडबुड करू नये असा संदेश उलेमांना व मौलवी फारूक शाब्दी यांनी दिला होता. त्याची तिव्र प्रतिक्रिया समाजात उमटली होती. आता त्याच उलेमांचा सल्ला घेतल्याचं त्यांनी नमूद केले आहे आणि आपला दुटप्पीपणा सिद्ध केला आहे. रमजानचा पवित्र महिना सुरू होण्याअगोदर एका भाजप आमदारांशी फारूक शाब्दी यांनी सोलापूरच्या घरावर भेट घेतली होती. त्या भेटीचा रहस्य काय हा प्रश्न सध्या समाज विचारतोय.
त्याचबरोबर रमजान ईदच्या चाँदरातच्या दिवशी व त्याच्या काही दिवसाच्या अंतराने काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाबरोबर दोनदा भेट घेऊन चर्चा झाली. त्या भेटीमागचे अर्थपूर्ण कारण काय? किंवा त्या दोन्हीं भेटीनंतर आपण उमेदवार दयायचे नाही असे आपण ठरवले आहे काय? हे जनतेसमोर येणे अत्यंत आवश्यक आहे.
देशातील सांप्रदायिक शक्ती जात धर्माच्या नावाने राजकारण करून मुस्लिमांना वेठीस धरत आहेत अशा कठीण परिस्थितीत गंगा-जमुना संस्कृती अबाधित ठेवून हिंदू मुस्लिम समाजामध्ये बंधुता निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे देशहितासाठी आवश्यक आहे. भाजपाच्या जात धर्माच्या नावाखाली सुरू केलेला नंगानाच आणि एम आय एम ने त्याच पद्धतीचे जातिय तेढ निर्माण करणारी भूमिका आजपर्यंत वठवली आहे. यापुढेही धार्मिक व्देषाचा राजकारण एम.आय.एम पक्षाच्या वतीने संपवून सद्भावना निर्माण करण्याची सुतराम शक्यता नाही.
भारतीय संविधानाच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर असताना पक्षाच्या सुज्ञ कार्यकर्त्यांनी याचा विचार करून आपली धर्मनिरपेक्ष बांधिलकी सिध्द करावी असे आवाहन कोमारोव्ह सय्यद, रेश्मा मुल्ला, रियाज सय्यद, तौशिफ काझी यांनी केले आहे..