कलावंतांनी आरोग्याच्या तंदुरुस्तीबद्दल दक्ष असावे…डॉ. श्रीकांत येळेगावकर

चित्रपट व नाट्य कलावंतांना आपला अभिनय उत्तम व्हावा असे वाटत असते. ते रंगीत तालीम व प्रयोग सादर करण्यात व्यस्त असतात. त्यामुळे त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. म्हणून त्यांनी नियमित वैद्यकीय तपासण्या करून घ्याव्यात. डॉक्टरांचा सल्ला अमलात आणावा. अनेक प्रतिष्ठित कलावंतांनी आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांचे अकाली निधन झाले आहे म्हणून कलावंतांनी नियमित पुरेसा व्यायाम, पुरेशी विश्रांती, सकस आहार, व्यसनापासून दूर राहणे आवश्यक आहे असे प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सोलापूरचे अध्यक्ष व माजी आमदार प्रकाश यलगुलवार हे होते.
प्रारंभी नटराजमूर्तीची पूजा करून दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा सीमा यलगुलवार यांनी केले.
ते बालरंगभूमी परिषद, शाखा सोलापूर, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, सोलापूर शाखा, रोटरी क्लब ऑफ सोलापूर, लिमये ॲक्युप्रेशर व ॲक्युपंक्चर केंद्र, अवधूत डेंटल क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरातील कलावंतांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब सोलापूरचे अध्यक्ष सुनील माहेश्वरी, सचिव ब्रिजकुमार गोयदानी, पराग कुलकर्णी, डॉ. प्रांजली मार्डीकर, नॅबचे पदाधिकारी डॉ. किशोर देशपांडे, बालरंगभूमी परिषद सोलापूर जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष सौ अर्चना अडसूळ, सल्लागार ज्योतिबा काटे, कोषाध्यक्ष सुनंदा शेंडगे, कार्यकारणी सदस्य सुभाष माने, सुमित फुलमाडी, अशोक किल्लेदार, किरण फडके, मिलिंद पटवर्धन, संस्थेचे सचिव शशीभूषण यलगुलवार, प्राचार्य नरसिंह आसादे, एफ.पी.ए.आय. सोलापूर शाखेचे शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड आदी उपस्थित होते.
या शिबिरात सोलापुरातील कलावंतांची शुगर तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी व्यंकटेश कंची यांनी केली, ब्लड प्रेशर तपासणी, जनरल चेकअप करून उपचार डॉ. योगेश पल्लोलू यांनी केली. ॲक्युप्रेशर व ॲक्युपंक्चर चेकअप व मार्गदर्शन डॉ. मुकुंद लिमये यांनी केले. दंत रोग तपासणी डॉ. प्रांजली मार्डीकर यांनी केली. तपासणी शिबिरात 110 कलावंतांनी तपासणी करून घेतली.
सूत्रसंचालन अर्चना अडसूळ यांनी केले तर आभार परिषदेचे सुभाष माने यांनी मानले.
फोटो ओळी : बालरंगभूमी परिषदेच्या कलावंतांकरिता आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करताना डॉ. श्रीकांत येळेगावकर, प्रकाश यलगुलवार, सुनील माहेश्वरी, ब्रिजकुमार गोयदानी, डॉ. प्रांजली मार्डीकर, सीमा यलगुलवार, डॉ. किशोर देशपांडे, अर्चना अडसूळ, शशीभूषण यलगुलवार, अर्चना अडसूळ, ज्योतिबा काटे, सुनंदा शेंडगे, सुगतरत्न गायकवाड आदी दिसत आहेत.