कारवाई होऊ नये म्हणून लग्न केले; गर्भपात करून दिली मारण्याची धमकी…
सोलापूर : लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार केला, पोलीस कारवाई होऊ नये म्हणून लग्न केले. त्यानंतर गर्भपात करून, शिवीगाळ व मारहाण करत धमकी दिल्याप्रकरणी चौघांविरूद्ध जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
लग्नाचे अमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार केला. कोणत्याही प्रकारची पोलिस कारवाई होऊ नये म्हणून पीडीतेशी लग्न केले. लग्नानंतर पीडीत महिला गर्भवती झाली, त्यामुळे पतीने तिला एका हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे तिच्या इच्छे विरूद्ध गर्भपात करून घेतला. पतीची पहिली बायको, आई व दोन भावांनी पीडीता राहात असलेल्या घरी जाऊन शिवीगाळ केली. मारहाण करून तिला धमकी दिली अशी पीडीतेने फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार शरीफ बागवान, आलीया शरीफ बागवान, शरीफची आई दौलतबी बागवान, भाऊ राजू अझरोद्दीन, पप्पू व रिजवान सय्यद (सर्व रा. सोलापूर) यांच्या विरूद्ध भादवि कलम ४९८(अ), ३७६, ३१३, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.