खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी अटकेतील ३ आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथून जामीन मंजूर…
खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी अटकेतील ३ आरोपी नामे स्वामीराव खरात ,मच्छिंद्र खरात व दयानंद खरात सर्व ( रा.कोळेकर वाडी ता. अक्कलकोट जि.सोलापूर ) यास मे. जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
सदर प्रकरणात यातील आरोपी स्वामीराव खरात यास त्याचे भाऊ फिर्यादी विष्णू खरात यांनी मुलाच्या लग्नासाठी न बोलवल्यामुळे त्याचा राग मनात धरून फिर्यादीने लग्नात का बोलवले नाही यावरून चिडून फिर्यादी वास्तव्यास असलेल्या घरासमोर येऊन शिवीगाळ व दमदाटी करण्याचा प्रयत्न यातील तिन्ही आरोपींनी केला होता. तदनंतर यातील आरोपींनी फिर्यादीच्या घरासमोर मारहाण करत असता सदरील घटना सोडवा- सोडवी करण्याकरिता फिर्यादीचा मुलगा सागर खरात हा मध्ये येत असताना यातील आरोपी दयानंद खरात यांनी त्याचे कमरेतून चाकू काढून सागर याचे पोटात वार केला होता तसेच दुसरा वार त्याच्या हातावर देखील केला होता. तसेच घटनेवेळी इतर दोन आरोपींनी मच्छिंद्र खरात व स्वामीराव खरात यांनी देखील दगडाने व लाथा बुक्क्यांनी फिर्यादीच्या पाठीत व पायावर मारहाण केली होती. सदरील गंभीर घटनेनंतर यातील आरोपी गावातील लोक गोळा झाल्याने वाहनावरून निघून गेले होते. त्यानंतर यातील जखमी सागर खरात त्याच्या पोटात व हातात गंभीर जखम झाल्याने त्यास प्राथमिक आरोग्य केंद्र उपचाराकरिता घेऊन गेले असता त्वरित सोलापूर येथे यशोधरा रुग्णालय येथे दाखल केले होते. सदरील आरोपींनी जीवे ठार मारण्याची उद्देशाने हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा केले असल्याची फिर्याद अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे येथे गुन्हे क्रमांक- १२८/२०२४ अंतर्गत दाखल करण्यात आली होती. यातील आरोपींनी आपला जामीन अर्ज मे. जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता. मा.जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.खुणे यांनी आरोपींचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे. वरील प्रकरणात आरोपी तर्फे ॲड.कदीर औटी,ॲड. दत्तात्रेय कापुरे,ॲड. निलेश कट्टीमनी, ॲड. वैभव बोंगे यांनी काम पाहिले