सोलापूर बातमीखेळमहाराष्ट्र

जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२३-२४ साठी अर्ज करण्याचे आवाहन…

सोलापूर जिल्हयातील उत्कृष्ट क्रीडा व खेळाडू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने जिल्हयातील खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक याचे करिता शासनातर्फे जिल्हा क्रीडा पुरस्कार दिला जातो.

१. गुणवंत क्रीडा मार्गदर्शक – (०१)

२. गुणवंत खेळाडू (०१ महिला, ०१ पुरुष व ०१ दिव्यांग खेळाडू)

सदर पुरस्कारासाठी दिनांक ०१ जुलै ते ३० जून या कालावधीसाठी मागील खेळाडूंसाठी पाच वर्षाची कामगिरी विचारत घेतली जाईल तसेच क्रीडा मार्गदर्शकासाठी दहा वर्षाची कामगिरी विचारात घेतली जाईल..
जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करणा-या अर्जदा-याचे त्या जिल्हयात किमान १५ वर्ष वास्तव्य अत्तले पाहिजे. क्रीडा मार्गदर्शक म्हणून सतत दहा वर्ष महाराष्ट्रात क्रीडा मार्गदर्शकाचे कार्य कलेले असले पाहिजे. व त्याने वयाची ३५ वर्ष पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. खेळाडूंने पुरस्कार वर्षासह लगतपूर्व ०५ (पाच) वर्षापैकी ०२ (दोन) वर्षे त्या जिल्हयाचे मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत स्पर्धेमध्ये प्रतिनिधीत्व केले असले पाहिजे.

क्रीडा मार्गदर्शकासाठी गेल्या १० वर्षात किमान वरिष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय पदक विजेते तसेच कनिष्ठ शालेय, ग्रामीण व महिला (खेलो इंडिया) मधील राष्ट्रीयस्तरा पर्यंत पदक विजेते खेळाडू तयार केले असतील असे क्रीडा मार्गदर्शक अर्ज करण्यास पात्र राहतील, सांघिक अथवा वैयक्तिक मान्यताप्राप्त क्रीडा प्रकारात नॅशनल गेम्स, यरिष्ठ राष्ट्रीय अंजिक्यपद स्पर्धेत प्रतिनिधीत्व केलेला खेळाडू अथवा राज्य/जिल्हा अजिक्यपद स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकापर्यंत यश मिळविणारे किमान तीन खेळाडू घडविणारा मार्गदर्शक विहीत नमुन्यातील अर्ज संघटनेमार्फत अथवा वैयक्तिक रित्या मुदतीत सादर करणे आवश्यक राहील.

तरी सबधितानी अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अविकारी कार्यालय सोलापूर यांच्याशी संपर्क साधून विहीत नमुन्यातील अर्ज दिनांक ३० डिसेंबरे २०२४ पर्यत परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल कुमठा नाका सोलापूर येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. नरेंद्र पवार यांनी केले आहे….

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel